मुंबई : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. अशा पद्धतीचे व्हिडीओ पाहायला अनेकांना आवडतात. सध्या एका स्मशानभूमीतील (Scary Viral Video) एक व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. एक घाबरवणारा आणि हसवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेक नेटकऱ्यांना हसू कंट्रोल होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जोरात ओरडण्याच्या व्हिडीओमुळे अनेकजण घाबरले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण स्मशानभूमीतील (social media) आहे.
पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी भयानक जागेवर जावं लागतं. अनेकदा गुंडांशी संघर्ष करुन त्यांना ताब्यात घ्यावं लागतं. आपण म्हणू शकतो की, पोलिसांना सुध्दा भीती असते. त्यावर विश्वास ठेवणं प्रत्येकाला शक्य होत नाही. सध्या एक असाचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये पोलिस इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झालेला व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. पोलिसांना खबर मिळाल्यानंतर ते एकाचा शोध घेण्यासाठी स्मशानभूमीत जातात. रात्रीची वेळ असल्यामुळे पोलिस स्मशानभूमीत हातात छोटी बॅटरी घेऊन गेले आहेत. त्याचवेळी जोरात ओरडण्याचा आवाज येतो आणि सगळे इकडे-तिकडे पळू लागतात. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण हसत असल्याचं कमेंटमध्ये सांगितलं आहे.
Even the Police is Scared in the Cemetery pic.twitter.com/nsiPQWm2Ee
— The Figen (@TheFigen_) April 15, 2023
हा व्हिडीओ ट्विटरवरती @TheFigen_ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ पाहिल्यापासून त्यावर अनेक चांगल्या वाईट कमेंट येत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, तो स्मशानाच्या मधोमध त्याचे घर बांधणार आहे. आणखी एका वापरकर्त्याने स्मशानभूमी हे पोलिसांपासून वाचण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे सांगितले आहे.