पोलिसाचे ‘हे’ गाणे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, सोशल मीडियावर या गाण्याची भुरळ

| Updated on: Oct 13, 2022 | 5:36 PM

या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत 7 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक कमेंट्सही व्हिडिओवर आल्या आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरला असून खूप लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

पोलिसाचे हे गाणे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, सोशल मीडियावर या गाण्याची भुरळ
पोलिसाचे 'हे' गाणे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : सोशल मीडियावर नेहमीच गाण्याचे बरेच व्हिडिओ पोस्ट होत असतात. हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंती मिळवतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Video viral on social media) सध्या धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी (Police constable video) आपल्या सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीत (Patriotic Song) गात आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरला असून खूप लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. घोरपडे यांच्या मधुर आवाजाने युजर्सला मंत्रमुग्ध केलं आहे.

पुणे पोलीस दलात कार्यरत कॉन्स्टेबलने गायले आहे गाणे

हे गाणे पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल सागर घोरपडे यांनी गायले आहे. या गाण्यातून सागर यांची देशभक्ती दिसून येत आहे. सागर यांच्या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. हे ओरिजनल गाणे बॉलीवूड गायक अरजित सिंह याने गायले आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवर व्हिडिओ शेअर

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याच्या ‘भुज’ या चित्रपटातील ‘देश मेरे’ हे गाणे गायले असून, घोरपडे यांचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुणे शहर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

व्हिडिओला 7 हजाराहून अधिक व्ह्यूज

या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत 7 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक कमेंट्सही व्हिडिओवर आल्या आहेत. युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले आहे की, खूप छान व्हिडिओ आहे. इतका सुंदर आवाज ऐकून मी दंग झालो. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, खूप सुंदर.