मुंबई : ‘पुष्पा ’ (Pushpa) हा सिनेमा रिलीज होईन आता बरेच दिवस झाले. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. यातले डायलॉग, या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. आजही या सिनेमातील गाणी डायलॉग चर्चेत असतात. त्यावर व्हीडिओ बनतात. आजही या सिनेमातील फ्लावर नहीं, फायर हूँ मै या डायलॉगची काश्मीरी तरूणाने म्हटलेला डायलॉग ट्रेंडिग आहे. यात तो काश्मीर खोऱ्यातील एका पाण्याच्या ठिकाणी फुलांच्या बोटीत उभं राहून हा डायलॉग म्हणताना दिसस आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात पुष्पा या सिनेमातील फ्लावर नहीं, फायर हूँ मै या डायलॉगची काश्मीरी तरूणाने म्हटलेला डायलॉग ट्रेंडिग आहे. यात तो काश्मीर खोऱ्यातील एका पाण्याच्या ठिकाणी फुलांच्या बोटीत उभं राहून हा डायलॉग म्हणताना दिसस आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Flower Nahi, Fire Hai Mein!#Kashmir #Kashmiris pic.twitter.com/fun5CDrF2U
— Namrata (@SrinagarGirl) April 27, 2022
मागे शांत वाहणारं पाणी अन् त्यातून वाट काढणारी होडी. त्यावर ठेवलेली फुलं अन् त्याच्या मध्ये उभं राहून पुष्पाची स्टाईल मारणारा काश्मीरी तरूण असा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हीडिओ SrinagarGirl या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आली होती. त्याला “फ्लावर नहीं, फायर हूँ मै”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हीडिओ दहा हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर साडे चारशेहून अधिक लाईक्स याला मिळाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर आणखी असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला पुष्पा सिनेमातील ‘पुष्पा… पुष्पराज पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फायर हू मै… झुकेगा नहीं साला’, हा डायलॉग तो म्हणताना दिसत आहे. हा व्हीडिओ द फ्रेंडशीप डेज् या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा चिमुकला इतक्या गोंडस पद्धतीने हा डायलॉग म्हणतोय की तो अनेकांना आवडला आहे. या व्हीडिओला अनेकांनी लाईक केलंय. तर अनेकानी कमेंट करत आपल्याला हा व्हीडिओ आवडल्याचं म्हटलंय. तर काहींनी तिच्या निरागतेवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.