जकार्ता: इंडोनेशियामध्ये एक दुर्मिळ आणि विचित्र फुल आढळले आहे. हे फुल अतिशय आकर्षक आहे. पण या फुलाचा वास अत्यंत घाणेरडा आहे. कुजलेल्या प्रेताप्रमाणे या फुलाचा वास येतो. या फुलातून इतकी दुर्गंधी येते कित्येक किलोमीटर वरून देखील हा वास येतो.
इंडोनेशियामध्ये जंगलात ट्रेकिंग करीत असताना एका ट्रेकरला हे फुल दिसून आले. ‘रॅफलेसिया अर्नोल्डी’ असे या फुलाचे नाव आहे.
हे फुल जगातील सर्वात मोठे फूल असल्याची माहिती समोर आली आहे. हे महाकाय फूल सुगंधी नसून अत्यंत दुर्गंधी आहे.
इंडोनेशियाच्या वर्षावनात त्याला हे फुल उमललेले आहे. या फूलाची उंची साधारण तीन फुटांपर्यंतही असून याचे वजन 15 पौंड इतके आहे.
हे फुल लाल आणि गुलाबी रंगात आहेत. त्याच्या पाकळ्यांवर सफेद डाग आहेत. यामुळे हे फुल दिसायला अत्यंत आकर्षक दिसते. मात्र, या फुलाचा वास अत्यंत घाणेरडा आहे.
ज्या ट्रेकरला हे फुल दिसले त्याने याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्सनी या फुलाविषयी आश्चर्य व कुतुहल वाटत आहे.
या फुलाला सडलेल्या मृतदेहासारखी दुर्गंधी येत आहे. इंग्रजीत या फुलाला ‘कॉर्प्स फ्लॉवर’ असे म्हटले जाते. दुर्गंधीमुळे जनावरे सुद्धा त्याच्या जवळ जात नाहीत.
A man came across this rare flower while walking through an Indonesian forest. The rafflesia arnoldii is the largest flower in the world & only blooms for a couple of days. It is colloquially known as a corpse flower for the overpoweringly stinky odor it emits while mid-bloom. pic.twitter.com/LJmJDgfpqd
— NowThis (@nowthisnews) September 28, 2022