भारतीय रेल्वेचे जाळे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वेतून दररोज अडीच कोटी लोक प्रवास करीत असतात.लांबचा प्रवास आरामदायी होण्यासाठी लोक रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. ट्रेनमध्ये जनरल डब्यात गुराढोरांप्रमाण कोंबलेल्या प्रवाशांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सणासुदीच्या काळात भयंकर गर्दी असल्याने बाथरुम जवळ नाकमुठीत धरुन बसलेल्या प्रवाशांचे व्हिडीओ व्हायरल होत असतो, तर सिट न मिळाल्याने जुगाड करुन झोपळा तयार करीत त्यावर पहुडलेला अशा व्हायरल व्हिडीओतून दिसत असतो. परंतू अलिकडे ट्रेनमधील प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात प्रवाशा बर्थतर मिळालेली आहे. परंतू त्याची अवस्था ‘भीक नको पण कूत्रे आवर’ अशी झालेली आहे.पाहा काय नेमका प्रकार आहे…
सोशल मिडीयावर रेल्वेच्या संबंधित समस्यांना व्हिडीओमधून प्रवासी वाचा फोडत असतात. परंतू अलिकडे एक असा व्हिडीओ व्हायलर झाला आहे की तो पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओतून साईड बर्थ सीटची अडचण समोर आणली आहे. हा व्हिडीओ सणासुदीच्या काळातील गर्दी असतानाचा आहे.हा व्हिडीओ पासून ही बर्थ कोणाला मिळू नये अशी प्रार्थना लोक करीत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत एक कोटी लोकांनी पाहीले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
या व्हिडीओ एक व्यक्ती ट्रेनच्या साईड अपर बर्थवर झोपलेला दिसत आहे. म्हणजेच झोपायचा प्रयत्न करताना दिसत आहे ! कारण बर्थला लागूनच दरवाजा आहे, आणि वेंडरपासून ते प्रवासी येजा करताना दिसत आहेत. यामुळे बिचाऱ्या त्या प्रवाशाला एक क्षणही डोळे झाकून झोपण्याची फुरसत मिळताना दिसत नाहीए…ही बर्थ दरवाजाला जवळच आहे. तो झोपण्याचा वारंवार प्रयत्न करतोय परंतू दर काही मिनिटांनी दरवाजा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून उघडल जात आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उजेड पडून तसेच दरवाजाचा आवाज येऊन त्याला वारंवार जाग येत आहे. अशा विचित्र कोंडीत तो सापडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
या व्हि्डीओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्या प्रवाशाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तर त्याने दुसरी कुस वळवून भिंतीकडे तोंड करुन झोपायला हवे होते असा सल्लाही काहींनी दिला आहे. साईड बर्थवर झोपणाऱ्या अनेक प्रवाशांनी या मुद्द्यावर सहमती व्यक्त करीत ही सीट आरामदायी नसते खासकरुन ती जेव्हा दरवाजा जवळ येते. तर अनेकांनी सहानुभूती व्यक्ती ही सिट कोणाच्यात नशिबात मिळू नये अशी प्राथर्नाही व्यक्त केली आहे.