Sawfish video : जगात असे अनेक मासे आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांना माहितीही नाही. त्याचे नावही माहीत नसते, पाहणे तर दूरची गोष्ट. एका अहवालानुसार, जगात 33 हजारांहून अधिक माशांच्या प्रजाती ज्ञात आहेत, परंतु लोकांना यापैकी 200-400 माशांची माहिती असेल. त्यामुळेच असे मासे अनेक मच्छिमारांच्या जाळ्यात अडकतात, ज्याला पाहून सर्वसामान्य नागरिक चक्रावले आहेत. अलीकडेच काळात कर्नाटकातूनही (Karnataka) असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे 24-25 फूट लांब सॉफिश (Sawfish) मासा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो चुकून ‘सी कॅप्टन’ नावाच्या लेलँड बोटीच्या (Boat) जाळ्यात अडकला. हा मासा चुकून ‘सी कॅप्टन’ नावाच्या लेलँड बोटीच्या जाळ्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रेनवर मासे लटकलेले आणि बंदरातून हळूहळू दूर नेले जात असल्याचे दिसत आहे. ते मंगळुरूतील एका व्यापाऱ्याला विकले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
@dpkBopanna नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला नऊ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच हा व्हिडिओ पाहून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये पकडलेल्या प्रचंड सॉफिश (Sawfish)चे वजन सुमारे 250 किलो आहे. तज्ज्ञांच्या मते, कारपेंटर मासा ही एक प्रजाती आहे, ज्याची संख्या झपाट्याने घटली आहे.
A critically endangered species- the sawfish or carpenter shark becomes a victim of commercial net fishing in Malpe Udupi. pic.twitter.com/mOgElC45Al
— Deepak Bopanna (@dpkBopanna) March 11, 2022
वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची अंतर्गत ही भारतातील संरक्षित प्रजाती आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामधील एका अहवालानुसार, सॉफिशची कमाल लांबी 23 फूट किंवा त्याहून अधिक असू शकते. या माशाचे प्रौढ वय 10 वर्षे आहे, तर त्यांचे एकूण वय 25 ते 30 वर्षे आहे. हा मासा शरीराच्या आत अंडी घालतो. असे म्हणतात की माशाचे पंख आणि दात औषध म्हणून वापरले जातात. याशिवाय अनेक लोक ते चिकन फायटिंगमध्ये वापरण्यासाठी विकत घेतात.