Rare green furred puppy : सोशल मीडियावर आपण व्हिडिओ, फोटो पाहत असतो. विशेषत: जे व्हायरल होतात, ते कुठेतरी लोकांना आवडलेले असतात, त्यामुळे वेगाने शेअर केले जातात. आता एक आगळाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो आहे एका कुत्र्याचा.. तुम्ही म्हणाल, सोशल मीडियावर (Social media) तर कुत्र्याशी (Dogs) संबंधित हजारो फोटो आणि व्हिडिओ (Videos) नेहमीच अपलोड होतात, त्यात वेगळं ते काय? मात्र आता जो फोटो व्हायरल झालाय, तो खूप वेगळा आहे. अत्यंत दुर्मीळ घटनेत एका कुत्र्याने हिरव्या पिल्लाला जन्म दिला आहे. तेव्हापासून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या हिरव्या रंगाच्या पिल्लाचा जन्म होताच त्याचे मालक घाबरले. या पिल्लाची आई फ्रेया बुलडॉग प्रजातीची आहे.
कुत्रीनं एकूण 8 पिल्लांना जन्म दिला असून त्यापैकी एका पिल्लांचा रंग हिरवा आहे. या दुर्मीळ कुत्र्याच्या मालकाचे कुटुंब कॅनडामध्ये राहते. ऑड्राने याबाबत फेसबुकवर एक पोस्टही लिहिली आहे, तिच्या मते, ‘छोटे हिरवे पिल्लू दिसणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. हा रंग खूप छान दिसतो, तो तसाच राहावा अशी माझी इच्छा आहे. पिल्लांपैकी काही काळ्या आणि इतर रंगांची आहेत.
त्याचवेळी कुत्र्याचा हा हिरवा रंग गर्भातील हिरव्या बिलिव्हरडिनमुळे (Green bile biliverdin) आला असावा, अशी भीतीही कुत्र्याच्या मालकाने व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रेव्हरने सांगितले, की जेव्हा हे पिल्लू जन्माला आले, तेव्हा विश्वास बसत नव्हता, की असे घडू शकते. यानंतर त्यांनी कुत्र्याला थोडे घासून पाहिले, तरीही त्याचा रंग हिरवाच होता. त्यानंतर गुगलवरही सर्च केले. परंतु असे घडणे अत्यंत दुर्मीळ असल्याचे दिसून आले.
यासंदर्भात डॉ. ब्राउनवेन क्रेन यांनी सांगितले, की अशी प्रकरणे 10 हजारांमागे असू शकतात. मात्र, यापूर्वी असे प्रकरण पाहिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 2020मध्येदेखील ‘द सन’ने असाच एक अहवाल प्रकाशित केला होता, ज्यामध्ये जिप्सी नावाच्या एका पांढऱ्या जर्मन शेफर्डने हिरव्या कुत्र्याला जन्म दिला होता. ज्याचे कारण नंतर तज्ज्ञांनी मेकोनियमला (Meconium) सांगितले होते, मेकोनियम हा एक मल आहे, जो नवजात कुत्रा आईच्या पोटात सोडतो.