पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू कोण माहितीये? संपत्ती जाणून धक्का बसेल, गिनीज बुकमध्येही नोंद

| Updated on: Mar 24, 2025 | 3:32 PM

पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या कमी असली तरी त्यातही असा एक हिंदू आहे सर्वात पाकिस्तानातील सर्वाच श्रीमंत हिंदू म्हणून ओळखला जातो.त्याचे नाव हे जगभरात प्रसिद्ध आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही त्याने आपल्या नावावर केला आहे.कोण आहे हा पाकिस्तानातील श्रीमंत हिंदू? जाणून घेऊयात 

पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू कोण माहितीये? संपत्ती जाणून धक्का बसेल, गिनीज बुकमध्येही नोंद
Deepak Perwani
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भारत आणि पाकिस्तानबद्दले अनेक किस्से किंवा अनेक घटना आपण नेहमीच ऐकत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की पाकिस्तानातही भारताप्रमाणेच हिंदू राहतात. पाकिस्तान भारतापासून जेव्हा वेगळं झालं तेव्हा तिथे हिंदू लोकसंख्या सुमारे 23 टक्के होती, पण सध्या ती फक्त 2.17 टक्के झाली आहे. पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या आणि व्हिडिओ वेळोवेळी येत राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानात एक असाही हिंदू आहे जो सर्वात श्रीमंत हिंदू म्हणून त्याची ओळख आहे. त्याची संपत्ती जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत

पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू दीपक परवानी आहे. खरं तर, पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने अलीकडेच 2023 सालाचा डेटा जारी केला आहे ज्यामध्ये दीपक परवानी यांचं नाव दिसतं. दीपक परवानी हे पाकिस्तानातील हिंदू समुदायातील सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. परवानी एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेता आहे. त्याने 1996 मध्ये त्याच्या फॅशन करिअरला सुरुवात केली. त्याचे स्वतःचे डीपी नावाचे फॅशन हाऊस आहे. दीपक परवानी याचे हे फॅशन हाऊस वधूचे आणि इतर फॅशन डिझायनर कपडे बनवते. दीपक परवानीला केवळ पाकिस्तानातच नव्हे तर जागतिक स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

पाकिस्तान वगळता जगातील अनेक देशांमध्ये दीपक प्रसिद्ध आहे

2014 मध्ये, दीपक परवानीची बल्गेरियन फॅशन अवॉर्ड्समध्ये जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वोत्तम फॅशन डिझायनर म्हणून निवड झाली. यासोबतच दीपक परवानीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदले गेले आहे. जगातील सर्वात मोठा कुर्ता बनवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. दीपक परवानी यांचे नाव पाकिस्तान वगळता जगातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने बॉलिवूड संगीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह अनेक जागतिक सेलिब्रिटींसाठी काम केले आहे.

अनेक देशात फॅशन डिझायनर म्हणून… 

दीपक परवानी चीन आणि मलेशियासारख्या देशांमध्ये फॅशन डिझायनर म्हणून ओळखला जातो. त्याला सात लक्स स्टाईल पुरस्कार, पाच बीएफए पुरस्कार आणि इंडस स्टाईल गुरु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दीपक परवानी हा पाकिस्तानातील हिंदू समुदायातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 71 कोटी रुपये होती.