मुंबई : अध्यात्मिकतेच्या आड आपला वेगळा पंथ आणि आश्रम चालवून त्याचा वापर आपली काळी कृत्ये करण्यासाठी करणाऱ्या अनेक तथाकथित बाबा-बुवांच्या कथा आपण ऐकल्या असतील, परंतू आपण कधी अशा व्यक्तीबद्दल ऐकले आहे का ? तीन रूममध्ये त्यांची 140 जणांची फॅमिली रहायची. तो सैनिक होता, ज्यानं शत्रूंची विमानं पाडली, जो मार्शल आर्टमध्ये ‘नंबर वन’ होता. नंतर अभिनयात हात आजमावला, ज्याने आपल्या जीवनात 11 बॅंकांना लुटलं, नंतर अध्यात्मिक गुरू होत ज्याने 14 पत्नी केल्या, लोक त्याला देव मानायचे त्याची कहानीच अजब रहस्यांनी भरलेली आहे.
‘फादर यॉड’ याचं खरं नाव ‘जिम बेकर’ होतं. तो एक फायटर पायलट होता. दुसऱ्या जागतिक महायुद्धात त्यानं जपानची 13 विमानं एकट्यानं पाडली होती. त्याला सिल्वर मेडल मिळालं होतं. तो जुजीत्सु मार्शल आर्टमध्ये चॅम्पियन होता. त्याच्या कहानीची सुरूवात साल 1969 मध्ये सुरु झाली होती. तेव्हा लॉस एंजिलिसच्या सनसेट स्ट्रीपवर एक रेस्टॉरंट सुरु केलं. तेथे संकरीत शाकाहारी जेवण मिळायचे. जिम मेकर युद्ध संपल्यावर हॉलिवूडमध्ये ‘टारझन’ चित्रपटाच्या ऑडीशनसाठी गेला पण त्याची निवड झाली नाही.
चित्रपटातील अपयशानंतर जिम बेकरने ‘ओल्ड वर्ल्ड’ आणि ‘अवेअर इन’ ही दोन रेस्टॉरंट उघडली ती खूप चालली, त्याचा रेस्टॉरंटचा धंदा इतका चालला की त्याच्याकडे अत्यंत महागड्या रोल्स रॉयजपासून अनेक कार दिमतीला आल्या. त्यावेळी मूळचे भारतीय धार्मिक योग गुरू योगी भजन यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर त्याने स्वत:चे तत्वज्ञान सुरू केले. फ्री लव्ह, आध्यात्मिक सेक्स हीच जीवनशैली असल्याचे सांगितले. आपला पंथाचे नाव ‘दि सोर्स फॅमिली’ ठेवले. सर्वजण एकत्र राहू लागले. देवाला हिब्रु भाषेत Yahwe म्हणतात त्यावरून ‘फादर यॉड’ने आपले नाव Ya Ho Wah ठेवले. त्याचा जप करायला शिष्यांना सांगितले. 140 पुरूष आणि महिला शिष्यांनी त्यांची आडनावे बदलून Aquarain ठेवली. नावाच्या जागी लव्हली, लोटस, सनफ्लॉवर अशी नावे धारण केली.
त्याच्या 14 बायकांपैकी एकच त्याची खरी बायको होती. त्याने तिला सोडले होते. नंतर एकापोठापाठ त्याच्या रेस्ट्रॉरंटमध्ये त्याच्या 140 फॅमिली सोबत अत्यंत लैंगिक सुख भोगत ऐषोआरामात रहायचा. तो स्विमिंग पुलात water aerobics शिकवाचा, नंतर त्याच्या घरातील सोळा वर्षांच्या मुलीही गर्भवती राहू लागल्याने त्याच्या विरोधात तक्रारी वाढू लागल्या. मग त्याने त्या गर्भवती मुलींची लग्ने त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी लावून दिली. त्याने स्वत:चा रॉक बॅंड काढला आणि 60 आल्बम काढले.
नंतर फादर यॉड पंथासह हवाई बेटावर रहायला गेला. 1975 मध्ये त्याने हॅंड ग्लायडींग करायला चाललो असे जाहीर केले. त्याचा त्याला काहीही अनुभव नव्हता. 1300 फूटांवरून डोंगरावरून कोसळून त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नव्हता तर आत्महत्या होती असे जॉन हॉपकिन्स वेबसाईटने म्हटले आहे. त्याला 1963 मध्ये दोघांच्या हत्ये प्रकरणात दोषी ठरवलं होतं, त्याने आपल्या एका अनुयालाला मी भगवान वगैरे नाही आणि आपण शरीर त्यागणार असल्याचे महिनाभरापूर्वीच त्याने सांगितले होते असेही या वृत्तात म्हटले आहे.