Viral Video : आकाश पाळणा खराब झाल्याने तीन तास रंगला थरार, उलटे टांगल्याने काय झालं ते पाहा

| Updated on: Jul 05, 2023 | 10:29 PM

Roller Coaster Viral Video: अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधून एक धक्कादायक प्रकार समरो आला आहे. या जत्रेत रोलर कोस्टर राइड खराब झाल्याने यात बसलेल्या लोकांचे हाल झाले.

Viral Video : आकाश पाळणा खराब झाल्याने तीन तास रंगला थरार, उलटे टांगल्याने काय झालं ते पाहा
Viral Video : आकाश पाळण्यात बसणं चांगलंच महागात पडलं, मौज सुरु असताना झालं की...
Image Credit source: Viral Video Grab/Twitter
Follow us on

मुंबई : रविवारी सुट्टी आली की पालक आपल्या मुलांना घेऊन मैदानात लागलेल्या जत्रेत फिरण्यासाठी घेऊन जातात. या जत्रेतील आकाश पाळणे कायमच लहानग्यांचं आकर्षण ठरलं आहे. कारण एवढ्या उंचावर थरार अनुभवायची मजाच काही औरच असते. पण आकाश पाळणे अनेकदा मृत्यूचे सापळेही ठरले आहेत. त्यामुळे यात बसताना काळजी घेणं गरजेचं आहे. असाच एक व्हिडीओ अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधून समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. कारण एक चूक जीवावर बेतणारी होती. एका जत्रेत रोलर कोस्टर पाळणा खराब झाला आणि लहान मुलं हवेत तीन तास लटकून राहीले. ही घटना पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचा थरकाप उडला. कोणताही अनुचित प्रकार घडून जीवितहानी होऊ नये यासाठी प्रत्येकजण देवाचा धावा करत होता.

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, विस्कन्सिनच्या क्रँडनमध्ये रविवारी फॉरेस्ट काउंटी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या जत्रेत असलेलं रोलर कोस्टर राइड घेताना अचानक खराब झालं. यामुळे सात मुलांसह एकूण आठ रायडर्स जवळपास तीन तास हवेत उलटे लटकून राहिले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विटरवर @rusashanews हँडलवरून साशा व्हाइट नावाच्या युजर्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. हवेत लटकलेल्या लोकांना खाली आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. जवानांनी सर्व कसब लावून अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणलाही दुखापत झाली नाही. रोलर कोस्टर खराब होण्यामागे तांत्रिक बिघाड असल्याचं बोललं जात आहे. अग्निशमन दलाचे कॅप्टन ब्रेनन कुक यांनी डब्ल्यूजेएफडब्ल्यू न्यूज चॅनेलला सांगितलं की, “मुलं खूपच घाबरली होती. पण त्यांनी धीर धरला. मुलं खूप वेळांपासून उलटी लटकली होती. प्राथमिक तपासात तांत्रिक खराब झाल्याचं दिसत आहे. इतर कारणांचा तपास केला जात आहे.”

हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, किती गंभीर घटना आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही देवाचे खूप खूप आभार.