मुंबई: आपण सोशल मीडियावर (Social Media) रोज नवे व्हिडीओ (VIDEO) पाहत असतो. काही प्राण्यांचे व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडत असतात असं अनेकदा दिसून आलं आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चार-पाच कोंबड्यांच्यामधून एक इसम त्यातील एक कोंबडी (Rooster Punishes Man Viral Video) घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर काय झालं ते व्हिडीओमध्ये पाहा.
प्राणी आणि मनुष्य यांच्यातील प्रेम सर्वश्रुत आहे. परंतु दोन प्राण्यांमधील प्रेम पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. कोंबड्याचं कोंबडीवरती किती प्रेम आहे हे त्या व्हिडीओतून दिसून आलं आहे.
Never touch my wife! pic.twitter.com/wUIAdpPs5W
— Figen (@TheFigen_) December 26, 2022
ज्या परिसरात चार ते पाच कोंबड्या आहेत. तिथं त्यांना काहीतरी खायला टाकलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूला गाड्या लावण्यात आल्या आहेत. त्या पाळीव कोंबड्या असं दिसतंय. एक इसम त्यातील एक कोंबडी पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी कोंबडा त्या इसमाचा पाठलाग करतो आणि कोंबडीला त्या व्यक्तीला सोडवायला भाग पाडतो.
हा संबंधित व्हिडीओ @TheFigen_ या वापरकर्ताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठल्या ठिकाणचा आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु व्हिडीओ अधिक लोकांना आवडला आहे. लोकं त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करताना दिसत आहेत.