या जगात आईचे नाते हे सर्व नात्यांपेक्षा फार वेगळे असते. माया लावणारी आई संकटात मात्र रणरागिणीचे रूप घेताना आपल्याला दिसते. आई ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलावर व कुटूंबावर एकही संकट येऊ देत नाही. आपल्या व्यक्तीवर आलेल संकट दूर करण्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते. याचे जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. रशियातील येकातेरिनबर्गमध्ये एका धाडसी आईने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला एका रॉटवीलर कुत्राच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी स्वत:च्या शरीराचा ढाल म्हणून वापर करत कुत्र्याला झुंज देऊ लागते. आता यामध्ये नक्की काय प्रकार घडला आहे ते सविस्तर जाणून घेऊयात
नेमकं काय घडल व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडियो रशियाच्या येकातेरिनबर्ग येथील आहे. यामध्ये रॉटवीलर जातीच्या कुत्र्याने अचानक आई व मुलावर हल्ला केल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. आपल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याला कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी एका आईने स्वत:च्या शरीराला ढाल बनवत रॉटवीलर कु्त्र्याशी झुंज देत राहिली. या लढ्यात आई जबर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात असलेली ही आई शेवटपर्यंत मुलाला झाकून कुत्र्यापासून त्याचा बचाव करताना दिसली. ही घटना केवळ हृदयद्रावकच नाही तर एका आईच्या धाडसाचे एक जबरदस्त उदाहरण आहे. कारण ती ज्या पद्धतीने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ढाल म्हणून कुत्र्याला झुंज देत होती त्यावरून आईच्या ममतेचे अद्वितीय प्रेम आणि निःस्वार्थ त्याग पुन्हा दिसून आलय.
Ещё одно нападение собаки: ротвейлер набросился на мать с пятилетним ребёнком в Екатеринбурге.
Собака сбежала у одного из жителей, пишут в местных группах. Когда она накинулась на ребёнка, матери пришлось прикрывать его собой pic.twitter.com/C0N5zUuHnf
— RT на русском (@RT_russian) February 26, 2025
रॉटविलरसारख्या आक्रमक कुत्र्याचा हल्ल्याला तोंड देणे एवढे सोपे नाही. कारण हे रॉटविलर जातीचे कुत्रे हे फार आक्रमक असतात. यावेळी हे भयानक दृश्य त्यांच्या कारमधील एका व्यक्तीने रेकॉर्ड केले होते, यामध्ये आक्रमक कुत्र्याच्या लढाईत आईची धडपड कैद केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, रस्त्याने जाणारे लोकही मदत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुत्र्याच्या हिसंकामुळे कोणीही पुढे सरसावले नाही. या 1 मिनिट 20 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल असले की कुत्र्याच्या हल्ल्यामुळे महिला रक्तबंबाळ झाली आहे.
रशिया टुडेने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले की, महिलेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे, तर तिचा डावा हात तुटला आहे.दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @RT_com नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर कारण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 16 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ही घटना घडली तेव्हा रॉटविलर कुत्रा त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटल्यानंतर परिसरात फिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. धोकादायक जातीच्या कुत्र्यांना मोकळे सोडले तर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात हे या भयानक घटनेवरून दिसून येते. अशा परिस्थितीत, मोठ्या आणि आक्रमक जातीच्या पाळीव कुत्र्यांसाठी अधिक कडक नियम असू नयेत असे तुम्हाला काय वाटते?