Snake Shocking Video : जगात अनेक प्रकारचे साप (Snake) आढळतात, परंतु आपण मानव विशेषत: भारतीयांच्या मनात कोणताही साप पाहून किंग कोब्रा(King Kobra)इतकीच भीती वाटते. कारण तो प्रचंड विषारी असतो. पण आणखी एक साप आहे, ज्याचं विष किंग कोब्राइतकंच धोकादायक आहे. तुम्हीही या विषारी सापाबद्दल वाचलं असेल आणि ऐकलं असेल, पण तुम्ही कधी याला उंच भिंतीवर सहज चढताना पाहिलं आहे का? नसेल तर असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला भीता वाटेल. हा व्हिडिओ घोणस (Russell’s viper) या विषारी सापाचा आहे.
सापाचं वैशिष्ट्य
व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक घोणस साप भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे, साप आपल्या शेपटीच्या मदतीनं भिंतीवर चढू शकतो. ही क्लिप पाहून तुम्हालाही हे लक्षात येईल, की विषारी सापांकडेही अशाप्रकारचं एक वैशिष्ट्य असतं. भिंतीवर चढणाऱ्या या सापाला नंतर पकडण्यात आलं.
ट्विटरवर शेअर
अर्पित मिश्रा नावाच्या अकाऊंटवरून 53 सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर यूझर्सनी कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. एका यूझरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलंय, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी एकदम नि:शब्द झालो आहे.’ तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, या विषारी प्राण्याची ही कला पाहून मला आश्चर्य वाटलं.’ दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की योग्य अंतर राखलं पाहिजे अशा विषारी सापांपासून.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
#Russell_Viper
Highly Venomous Snake
Identify Care fully. pic.twitter.com/dyEizAMYeO— Arpit Mishra, MP Forest (@ArpitForest) January 24, 2022
काही वेळातच होतो मृत्यू
विशेष म्हणजे घोणस या सापाची गणना जगातल्या सर्वात धोकादायक सापांमध्ये केली जाते. तो भारतातही आढळतो. भारतात आढळणारे साप अतिशय धोकादायक आहेत. या सापाचं विष इतकं धोकादायक आहे, की एखाद्या व्यक्तीला त्यानं चावा घेतला तर काही वेळातच त्या व्यक्तीच्या रक्तात गुठळ्या तयार होतात आणि अनेक अवयव निकामी होतात.