मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukrain War) सध्या घमासान युद्ध सुरू आहे. रोज हजारो सैनिक मारले गेल्याचा दावा दोन्ही देशांकडून करण्यात येतोय. गेल्या तेरा दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. दोन आठवडे तरी युक्रेन अजूनही झुकलेला नाही. युक्रेनचे सैनिक जीवाची बाजी लावून रशियाविरोधात जोमाने खिंड लढवत आहेत. सततच्या युद्धाने युक्रेन बेरिचारख झाला आहे. अनेक ठिकाणी पडक्या इमारती, जळालेल्या गाड्या, लहानग्यांचा आक्रोश, धुराचे लोट अशी परिस्थिती सध्या युक्रेनमध्ये आहे. मात्र या युद्धाच्या भूमिवरही प्रेमाचे गुलाब फुलले (Ukraine war Propose) आहे. सध्या या युद्धातला एक व्हिडिओ प्रचंड (Viral Video) व्हायरल होत आहे. आणि लोकंच्या चेहऱ्यावर स्माईल आणत आहे. कारण रशियापुढे गुडघे न टेकलेला हा सैनिक एका तरुणीला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसतोय. त्यामुळे हा अनोखा व्हिडिओ लोकांना आवडतोय. त्यामुळे नेटिझन्सनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
अखेर तिच्यासमोर गुडखे टेकले
Never gonna beat that spirit. ??#Ukraine️ pic.twitter.com/7Ilo0N2JBI
— Tatiana Bonneau (@TatianaBonneau) March 7, 2022
दुसरीकडे युद्धभूमिवर लग्नसोहळा
तर दुरीकडे एक विवाहसोहळा चर्चेत आला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये युक्रेनच्या एका जोडप्याने युद्धभूमीवर लग्न करून चर्चेत आले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी बरेच सैनिक जमा झाले आहेत, त्यापैकी एक सैनिक गिटार वाजवताना दिसत आहे आणि वधू हातात फुलांचा गुच्छ घेऊन उभी आहे. विशेष म्हणजे वधूही लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण आनंदी दिसत आहेत की युद्धाच्या वेदना ते विसरून गेल्या आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडला आहे.
युद्धभूमिवरच्या लग्नसोहळ्याचा व्हिडिओ
#Kyiv के युद्धक्षेत्र में एक #Ukrainian Couple ने शादी की.#UkraineRussianWar में मची तबाही के बीच भी लोगों में ऐसा उत्साह और गर्मजोशी होना अविश्वसनीय है.
God bless them. May love conquer the battles… pic.twitter.com/SfM0MT46J3
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 7, 2022
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहले आहे. ‘युक्रेनियन जोडप्याने कीवच्या रणांगणात लग्न केले. युक्रेन रशियन युद्धामुळे झालेल्या विध्वंसाच्या काळातही लोकांमध्ये असा उत्साह आणि जिव्हाळा असणे अविश्वसनीय आहे. देव त्यांना सुखी ठेवो. प्रेम लढाई जिंकू शकते. असे जबरदस्त कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.
Russia Ukrane War : …तर, अख्खा युरोप ‘गॅस’वर, कच्च्या तेलाचा भाव 300 डॉलर; रशियाची आगपाखड!
भारतीय सैन्यात दाखल होणार होता, आता युक्रेनकडून रशियाविरुद्ध लढतोय ‘हा’ तरूण