मुंबई : क्रिकेटर सचिन तेंडुलकर आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत सचिन तेंडुलकर राजस्थानात चुलीवरच्या स्वयंपाकाची चव घेताना दिसत आहेत. कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सचिन तेंडुलकर राहू शकतात. पण, त्यांनी चुलीवर स्वयंपाकाची चव घेतली. स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांशी संवादही साधला. हा व्हिडीओ सचिन तेंडुलकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरही केला. त्यात त्यांनी चुलीवरील स्वयंपाकाची चव काही न्यारीचं असल्याचं म्हंटलंय.
व्हिडीओत नेमकं काय?
जसं मी म्हंटल होत मी आलोय. पोळ्या कशापासून बनवत आहात. महिलांनी सांगितलं गहू आणि बाजरीपासून. चुलीवरील स्वयंपाकाची चव काही वेगळीचं असते. देशी तुपाची त्यांनी वास घेतली. एवढा तूप मी माझ्या जीवनात कधी खाल्ला नाही. पण, हा तूप आवडीनं खाणार, असं म्हणताना सचिन तेंडुलकर यांचा आवाज येत आहे.
व्हिडीओत सचिन चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी संवाद साधत आहेत. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ६ लाख ६८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. काही युजर्सनी आपली प्रतिक्रियाही दिली.
एक युजर म्हणतो, सचिन यांना असचं क्रिकेटचा भगवान म्हटलं जात नाही. काहीतरी विशेष आहे. दुसरा युजर म्हणतो, ज्या महिला चुलीवरील स्वयंपाक करत आहेत त्यांना त्या कुणाशी भेटल्या याची जाणीव असावी.