Indian army : एकीकडे रशिया-युक्रेन यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अशावेळी त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होतोय. यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते सैनिक (Soldiers). भारतीय सैनिक आणि त्यांच्याशी संबंधित विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सैन्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरूनही काही फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. त्यात कठीण परिस्थितीतही आपले जवान कसं कर्तव्य पार पाडतात, देशाची सेवा करतात, हे आपल्याला दिसून येतं. तर सोशल मीडियावर कंटेंट अपलोड करणारे कलाकारही जवानांशी संबंधित कंटेंट तयार करून तो अपलोड करत असतात. असाच एक भारतीय सैन्याविषयी आदरभाव (Respect) दर्शवणार व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झालाय. यूजर्स तो आवडीनं पाहत आहेत. तहान भूक, आपलं कुटुंब सर्वकाही विसरून देशाची सेवा करण्यासाठी ते सीमेवर लढत असतात. असंच काहीसं या व्हिडिओमध्ये दाखवलंय.
व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलंय, की जवान सुट्टीनिमित्त आपल्या गावी आले आहेत. गावात आल्यानंतर एक लहान मुलगा आपल्या जवान बंधूस ओळखतो आणि त्याच्या बहिणीला सांगतो, की तुझा भाऊ सुट्टीसाठी गावी आला आहे. मग बहीणही उत्साहात त्याला घेण्यासाठी बस थांबलेल्या ठिकाणी जाते. पण तिला तिथं भाऊ दिसत नाही. मग ती त्या लहान मुलाला रागावते, की का खोटं बोलला म्हणून. पण मुलगा म्हणतो, मी खरंच त्याला पाहिलं. पण मग असं काय होतं, की भावा-बहिणीची भेट होत नाही, ते या व्हिडिओतून आपल्याला दिसेल.
यूट्यूबवर सागर कालरा शॉर्ट (sagar kalra Shorts) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 14 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्यात वाढ होत आहे. ‘Salute to Indian army‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून भरभरून कमेंट्स ते करत आहेत. बहुतेकांनी ‘Jai Hind‘च्या घोषणा कमेंटमध्ये केल्या आहेत. (Video courtesy – sagar kalra Shorts)