मुंबई : जगण्यातला आनंद प्रत्येक क्षणात आहे. त्यामुळे आयुष्यातील क्षणा-क्षणाचा आनंद घेता यायला हवा, असं म्हटलं जातं. या वाक्याला पुरेपूर खरी ठरणारी माणसं आपल्याला भेटतात आणि त्यांची कृती आपल्याला कायम पुरेल एवढा आनंद देऊन जाते. असंच घडलं एका एसटीमध्ये… सांगली-पुणे (Sanagli-Pune) एसटीमध्ये (ST) प्रवासी बसले. तिकीट काढून झालं अन् मग महिला कंडक्टर (Female conductor) आपल्या जागी जाऊन बसली. एव्हाना एसटीचा प्रवास सुरू झाला होता. प्रवासी आपल्या इप्सितस्थळी पोहोचण्याची वाट पाहात होते. इतक्यात जे घडलं ते एसटीत सुगंध पसरवून गेलं. याची नोंद एसटीतील प्रवासी, मेहता पब्लिशिंग हाऊसच्या (Mehta Prakashan House) योजना यादव (Yojana Yadav) यांनी नोंद घेतली. नेमकं काय घडलं याविषयी योजना यादव यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आपल्या आयुष्यातही ही अशी आनंद पेरणारी माणसं आसायला हवीत, असं ही पोस्ट वाचून अनेकांच्या मनात आलं असावं….
योजना जाधव यांनी हा प्रसंग आपल्या पोस्टच्या माध्यामातून सगळ्यांसमोर पोहोचला आहे. योजना आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “तिनं आधी तिकिटं काढली. सगळ्यांचे तिकिटाचे व्यवहार चोख केले. गाडी सुरू झाली. नि ती ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर स्थिरावली. पर्समधून फुलं बाहेर काढली. दोन तीन फुलं केसात माळली. दोन तीन फुलं ड्रायव्हर शेजारी ठेवली. पुन्हा पर्समधून सुई दोरा काढला. आणि ती तल्लीन होऊन फुलं गुंफू लागली. माळ तयार झाली. ती तिनं ओंजळीत धरली. ओंजळ नाकाशेजारी नेत दीर्घ श्वास घेतला. तेव्हा तिचा चेहरा त्या सुगंधाशी स्पर्धा करत होता. पुढच्या थांब्यावर गाडी थांबली, तशी ती उठली आणि तिने ती माळ ड्रायव्हरच्या केबिनमध्ये लटकावली. तेवढ्यात शेजारी शिवशाही येऊन थांबली. शिवशाहीच्या ड्रायव्हरलाही तिच्या माळेचा मोह झाला. तो म्हणाला,’आम्हालाही द्या की मॅडम’ पण तिची फुलं संपली होती.”
“पहाटे साडे पाचची ही गाडी. नुसतं आवरून गाडी गाठायची तरी चार साडेचारला उठण्याला पर्याय नाही. तेवढ्यात आपल्यासोबतच्या लोकांचा प्रवास सुखकर करण्याचा विचार करून ही पहाटे उठून फुलं तोडून माळेची तयारी करून कामावर हजर झालेली. कामं सगळेच जण करतात. पण त्यातल्या अनिवार्यतेला वैतागलेले असतात. पण थोडयाशा प्रयत्नाने ती अनिवार्यता एखादया सुखद अनुभवात रुपांतरीत करता येते. काही माणसं ‘हो सके तो इसमे जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला हैं’ च्या तत्वानं जगत असतात. अशी माणसं मला सहधर्मा वाटतात.”, असं योजना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
आयुष्यातील जाणारा क्षण पुन्हा येणार नाही, असं समजून जगण्याचा आनंद घ्यायला हवं असंच या महिला कंडक्टर सांगत आहेत. याचा अवलंब आपणही आपल्या आयु्ष्यात करायला हवा…
संबंधित बातम्या