मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी आरोपी म्हणून १०२ दिवस तुरुंगात होते. संजय राऊत यांची आज जामीनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर आर्थर रोड जेलच्या गेटवर ते गाडीत बसले आणि त्यांच्या भावाने त्यांना मोबाईलवर त्यांची जेलमधून बाहेर पडण्याची दृश्य दाखवली. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मोबाईलवर हे सर्व दाखवताना सर्वात आधी जलद बातम्या देणाऱ्या Tv9 मराठीची लाईव्ह लिंकवर क्लिक करुन ही दृश्य दाखवली.
Tv9 मराठी हे सातत्यानं राजकीय घडामोडी महाराष्ट्राला अधिक जलद गतीने दाखवण्यात आघाडीवर आहे, सर्वात जलद बातम्या देणारी वाहिनी म्हणून Tv9 मराठीकडे प्रेक्षक पाहतात. यूट्य़ूबवर प्रेक्षक शेतात असले किंवा परदेशात, ते महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे, ते यूट्यूबवर Tv9 मराठी लाईव्हवर पाहतात.
संजय राऊत हे अनेक दिवसापासून तुरुंगात होते, अर्थातच जेलमध्ये मोबाईलला बंदी असते, त्यामुळे लाईव्ह बातम्या तर आणखी दूर, तेव्हा महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय, हे बाहेर येताना संजय राऊत यांनी सर्वात आधी पाहिलं ते Tv9 मराठी वर.
Tv9 मराठी महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय आणि नंबर १ वाहिनी ठरली आहे. महाराष्ट्रातील राजकारण आणि इतर घडामोडी जलद देणारी वाहिनी म्हणून Tv9 मराठीची ओळख आहे.