गुवाहाटी : इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. एका तरूणाला स्वत: च्या दारात स्कूटर असावी अशी खूप वर्षांपासूनची इच्छा होती. त्यामुळे त्याने कोणाकडेही हात न पसरता रोजच्या खर्चातून काही सुट्टे पैसे एका गल्ल्यामध्ये साठवण्यास सुरूवात केली, सहा वर्षे तो सुट्टे पैसे वेगळे बाजूला काढून साठवत होता, अखेर ही रक्कम त्याच्यासाठी स्कूटर घेण्या इतपत झाली आणि त्याने आपली इतक्या वर्षांची इच्छा कशी पूर्ण केली याची कहाणी मोठी इंटरेस्टींग आहे. कोण आहे हा तरूण जाणून घेऊया…
आपल्या आवडत्या बाईकसाठी गेली अनेक वर्षे सुट्टे पैसे साठवणारा हा हरहुन्नरी तरूण आसामच्या डारंग जिल्ह्यातील सिपाझर परीसरात राहणारा आहे. त्याचे नाव मोहम्मद सैदुल हक असे आहे. जर तुमचा दृढ निश्चय असेल तर कोणत्याही संकटावर मात करीत तुम्ही यशाला गवसणी घालताच, याचे हा तरूण उत्तम उदाहरण आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या बातमीनूसार सैदुल हक गुवाहाटीमध्ये एक छोटे दुकान चालवितो. त्याची अनेक वर्षांपासूनच दुचाकी घेण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी गल्ल्यात पैसे साठवण्यास सुरूवात केली. अखेर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले.
गेल्या सहा वर्षांपासून पैसे साठवत होता
सब्र का फल मिठा होता है, हे म्हणतात ते खरच आहे. मोहम्मद सैदुल यांनी अनेक वेळा हे पैसे इतर खर्चासाठी न वापरता आपल्याला कधी ना कधी दुचाकी घ्यायचीच आहे असा चंग बांधत पैसे जमा केले. सैदुल यांचे बोरागाव येथे दुकान आहे. स्कूटर खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरले आहे. आता मी आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शेजारच्या शोरूममध्ये 90,000 रूपयांची नाणी देऊन अखेर स्कूटर घेतली आहे.
#WATCH | Assam: Md Saidul Hoque, a resident of the Sipajhar area in Darrang district purchased a scooter with a sack full of coins he saved. pic.twitter.com/ePU69SHYZO
— ANI (@ANI) March 22, 2023
शोरूमवाला काय म्हणाला
इतकी नाणी जमा करणे मोठे धैर्याचे काम होते. परंतू त्याही पेक्षा मोठे संकट हे होते की एवढी नाणी घेणार कोण ? दुकानदार इतकी नाणी स्वीकारत नाहीत. परंतू जेव्हा दुचाकीच्या शोरूम मालकाला कळले की एका ग्राहकाने नव्वद हजार रूपयांची नाणी स्कूटर घेण्यासाठी आणली आहेत तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि तो आनंदीही झाला. शोरूम मालकाने सांगितले की जेव्हा मला माझ्या एक्झीक्यूटीव्हने मला सांगितले की एक जण नव्वद हजारांची नाणी घेऊन स्कूटर घ्यायला आला आहे. तर मी आनंदी झालो, कारण टीव्हीवर अशा बातम्या पाहील्या होत्या. मला तर वाटते त्याना चार चाकी वाहन घ्यावे.