मुंबई : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल (Scooty Viral Video) होतात. त्यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांसाठी धक्कादायक असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण विचारात पडले आहेत. कारण स्कूटी जाड विजेच्या तारांमध्ये अडकली आहे. ही स्कुटी विजेच्या तारांमध्ये कशी काय गेली, यावर व्हिडीओच्या (trending news) खाली मजेशीर कमेंट येत आहेत. तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. इतक्या उंचावर स्कुटी कशी काय ? असा तुम्हालाही प्रश्न पडेल. तो व्हिडीओ जम्मूतील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे.
सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो जम्मूतील आहे. काही लोकं म्हणत आहे की, ती स्कुटी मोठं वादळ आलं होतं. त्यावेळी विद्युत तारांच्यामध्ये अडकली आहे. ती स्कुटूी 15 फुट उंचीवर लटकली आहे. सांगितलं जात आहे की, चक्रीवादळामुळं मोठं नुकसान झालं आहे. स्कुटीला पाहण्यासाठी तिथली लोकं जमा झाली आहेत. व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळेल, की स्कुटी जाड तारांच्यामध्ये कशा पद्धतीने लटकली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. स्कुटी तारांमध्ये कशी काय अडकली असा अनेकांना प्रश्न पडला आहे. काही वेळाने ती स्कुटी एका क्रेन मदतीने खाली उतरण्यात आली आहे.
This reportedly happened in Jammu today , thanks to a storm . pic.twitter.com/Ax5lxcUfwj
— Sanjay Raina (@sanjayraina) June 18, 2023
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहीलं आहे की, ‘आकाशातून पडली का’. जाड तारांच्यामध्ये अडकलेल्या स्कुटी मालकीन म्हणाली की, मी ज्यावेळी हे सगळं पाहिलं तेव्हा मला सुध्दा आच्छर्य वाटलं. ही घटना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. तिथले सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यावेळी चक्रीवादळ येतं त्यावेळी वजनदारी सामान हवेत उडाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.