प्रत्येकाला आपलं हक्काचं घर असावं वाटतं. अलिशान घर असावं, त्यात सर्व सुविधा असाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे आयुष्याची सर्व पुंजी घालवून माणसं घर घेतात. आपल्या स्वप्नांचा महाल उभा करतात. काहींना अधिक मोठं घर हवं असतं म्हणून बंगला खरेदी करतात. काहींचा कल रो हाऊसकडे असतो. तर काहींना फार्महाऊसमध्ये राहायला आवडतं. आनंद अनुभवता यावा म्हणून अनेकजण फार्महाऊसची निवड करतात. पण आयुष्यभराची पुंजी देऊन फार्म हाऊस खरेदी केलं आणि त्यात वेगळंच काही निघालं तर…
एका वेबसाईटने एक धक्कादायक वृत्ती दिलं आहे. DIYशी संबंधित व्हिडिओ शेअर करणाऱ्या विकीने तिच्या फॉलोअर्सला एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मला एक जुना फार्महाऊस एकदम चांगल्या किमतीत मिळाला आहे. हा फार्महाऊस पाहिल्यावर मी जामच खूश झाले होते. मात्र, या घरात आम्ही नवराबायको राहायला आलो आणि आमची बोबडीच वळाली, असं विकीने म्हटलंय.
ज्या गोष्टीची कल्पनाही केली नव्हती, असं काही या दोघांच्या बाबतीत त्या फार्महाऊसमध्ये घडलं. आपण जेव्हा नव्या घरात शिफ्ट होतो. तेव्हा त्या घरातील कोपरा न् कोपरा नीट पाहतो. त्या घराचा किती वापर करायचा आहे. घर मजबूत तर आहे ना हे पाहण्यासाठी आपण या गोष्टी चेक करत असतो.
फार्महाऊसचा कोपरा न् कोपरा चेक करत असताना त्यांना एक रहस्यमय गोष्ट सापडली. या ठिकाणी त्यांना एक सीक्रेट दरवाजा दिसला. हा दरवाजा उघडल्यावर त्यांना त्यात काही शिड्या दिसल्या. दरवाजाच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला. हे जोडपं दरवाजा उघडून तळघरात गेलं. तळघरात जाताना दोघेही घाबरून गेले होते. पण दोघांनीही हिंमत केली आणि एक एक पाऊल टाकत पुढे गेले. पण दरवाजा उघडल्यावर त्यांना तळघरात दिसलं त्याने त्यांची तंतरली. दरवाजा उघडताच त्यांच्यासमोर एक दगडांची शिडी दिसली.
ही शिडी पाहिल्यावर हा रस्ता पाताळात जात असल्याचं वाटत होतं. या रस्त्यावर जुन्याकाळातील फुलांचे वॉलपेपर होते. त्यामुळे या दाम्पत्याला आश्चर्य वाटलं. हा रस्ता पाताळात तर जात नाही ना? अशी मनात शंका आली. त्यांनी तात्काळ याचा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.