Video | ‘ड्रममास्टर’ चिमुकलीचे कौशल्य पाहून तुम्हीही म्हणाल ‘काय टॅलेंट आहे?’; सोशल मीडिया युजर्सची मने जिंकणारा व्हिडिओ

| Updated on: Jun 05, 2021 | 12:09 AM

इतक्या कमी वयात ड्रम वाजवण्याची कला अवगत करणाऱ्या मुलीचे प्रचंड कौतुक केले जात आहे. तिचे कौशल्य पाहून भले भले लोक तोंडात बोटे घालत आहेत. (See the viral video of drum master baby girl, won the hearts of social media users)

Video | ‘ड्रममास्टर’ चिमुकलीचे कौशल्य पाहून तुम्हीही म्हणाल ‘काय टॅलेंट आहे?’; सोशल मीडिया युजर्सची मने जिंकणारा व्हिडिओ
‘ड्रममास्टर’ चिमुकलीचे कौशल्य पाहून तुम्हीही म्हणाल ‘काय टॅलेंट आहे?’
Follow us on

नवी दिल्ली : सोशल मीडियात जेवढे विनोदी व्हिडिओ लाकप्रिय होतात, तितकीच लोकप्रियता लहान मुलांच्या व्हिडीओला मिळते. अनेक पालक मंडळी आपल्या मुलांच्या अल्लडपणाचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियात शेअर करतात. सर्वच पालकांना आपल्या मुलांच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा व्हिडीओ बनवण्यात प्रचंड आनंद मिळतो. सोशल मीडियात व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचतो. त्यात मिळणारी दाद मुलांचा उत्साह वाढवतो. त्यांना नवनवीन अ‍ॅक्टिव्हिटी करायला प्रेरणा मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओतील लहान मुलगी ड्रम वाजवण्याचा आनंद लुटते आहे. इतक्या कमी वयात ड्रम वाजवण्याची कला अवगत करणाऱ्या मुलीचे प्रचंड कौतुक केले जात आहे. तिचे कौशल्य पाहून भले भले लोक तोंडात बोटे घालत आहेत. आजकालच्या मुलांमध्ये टॅलेंट ओतप्रोत भरलेले आहे, याचीच प्रचिती या व्हिडिओमधून येत आहे. (See the viral video of drum master baby girl, won the hearts of social media users)

चिमुकलीला तुम्हीही म्हणाल ‘ड्रम मास्टर’

व्हिडिओतील चिमुकलेचे ड्रम वाजवण्याचे कौशल्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही वेळ तुमच्या मनाला अनोखा आनंद मिळेल. या आनंदातूनच तुमच्या तोंडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया बाहेर पडेल. तुम्ही आपसुकच या चिमुकलीला ‘ड्रममास्टर’ म्हणाल. अर्थातच तुमच्या आधी जेवढ्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, त्या सर्वांनी चिमुकलीला वेगवेगळी विशेषणे वापरून कौतुकाची थाप दिली आहे. हजारो लोकांच्या मनावर या चिमुकलीने अधिराज्य गाजवले आहे. तिच्या अजब कौशल्याचीच ही पोचपावती म्हणावी लागेल.

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी अर्थात आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘काय टॅलेंट आहे!’ या कॅप्शनमधूनच त्यांची प्रतिक्रिया किती बोलकी आहे याचा अंदाज येत आहे. रुपिन शर्मा यांच्या फॉलोअर्सबरोबरच जेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे, तेवढे सर्व लोक या चिमुकलीच्या प्रेमात पडले आहेत. अनेकांनी चिमुकलीच्या नव्या व्हिडिओची प्रतिक्षा लागली असल्याची भावना व्यक्त केली आहे. (See the viral video of drum master baby girl, won the hearts of social media users)

इतर बातम्या

काम थांबवण्यासाठी महापौरांचं पत्र, बांधकाम विभागाकडून कार्यारंभाचे आदेश, नाशकातील उड्डाणपुलांवरुन शिवसेना-भाजपात कलगीतुरा

Reliance फाऊंडेशनने केंद्राकडे Johnson & Johnson लस आयात करण्याची मागितली परवानगी