असला नवरा नको गं बाई; नवरदेवाला पाहून नवरीचा पारा चढला; व्हिडीओ पाहिल्यावर पोट धरून हसाल

| Updated on: Jun 04, 2021 | 9:49 PM

सोशल मीडियात या व्हिडीओवर धम्माल कमेंट्सचा पाऊस पडत आहे. वधूने इतका थयथयाट का केला, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Seeing the bridegroom, the bride became angry; Hold your stomach and laugh when you watch the video)

असला नवरा नको गं बाई; नवरदेवाला पाहून नवरीचा पारा चढला; व्हिडीओ पाहिल्यावर पोट धरून हसाल
नवरदेवाला पाहून नवरीचा पारा चढला
Follow us on

नवी दिल्ली : लग्न म्हटले की हा सोहळा होण्याआधी आणि हा सोहळा झाल्यानंतर बऱ्याच धम्माल गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतात. घरात पाहुणे मंडळी येतात, मग त्यांचा घरातील वावर काही ना काही गंमती जंमती घडवत असतो. कधी आपल्या लग्नाच्या सोहळ्यात वरातीत गंमती जंमती पाहायला मिळतात. अशा गंमती जंमती घडल्याशिवाय लग्नाची मज्जाही वाटत नाही हेच खरे. हल्लीच्या काळात तरुण मंडळी आपल्या मित्रमैत्रिणीच्या लग्नाला हमखास हजेरी लावतात. ज्या मित्राचे लग्न असेल त्याला चिडवणे व त्याच्या होणाऱ्या नवरीवरून टोमणे मारणे असे किस्से घडतात. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मित्रमैत्रिणींच्या गंमतीजंमतीचा नाहीये, तर नवरदेवासमोर त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या रौद्रावताराचा आहे. वधू आपल्याला पाहून चेहऱ्यावर स्मितहास्य देईल, अशी वाट बघत बसलेला नवरदेव पत्नीचा पारा चढलेला पाहून पूर्ण गर्भगळीत झाला नसेल तर नवल. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसत बसाल एवढे नक्की. (Seeing the bridegroom, the bride became angry; Hold your stomach and laugh when you watch the video)

नेमकी काय धम्माल घडते?

इतर व्हिडिओंप्रमाणेच हा व्हिडिओ भारी धमाकेदार आहे. झाले अस्से की, नवरदेव लग्न मंडपातील आसनावर आधीच स्थानापन्न झालेला आहे. आपली जीवन साथीदार थोड्याच वेळेत येईल व तिला नजरेत साठवून घेईन, अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधलेली असेल कदाचित. वर्णाने काळा असलेल्या नवरदेवाला वधू कशीही असली तरी ती माझ्या राणीच असेल, असेच जणू वाटत असावे. काही वेळातच वधू समोर येते. तिच्या हातात ताट असते. ती नवरदेवाला ओवाळणी करण्यासाठीच एकेक पाऊल पुढे टाकून येत असते. तितक्यात तिची नजर तिच्या भावी जीवन साथीदाराच्या चेहऱ्याकडे जाते. आणि काय.. तर इथेच धम्माल घडते. समोरच्या खुर्चीवर बसलेला आपला नवरा वर्णाने काळा असल्याचे पाहून तिचा पाराच चढतो. ती हातातील ताट तिथेच फेकून देते. तसेच जोरजोरात ओरडते. तिचा हा थयथयाट पाहून समारंभाला हजर राहिलेल्या इतर नातेवाईक, पाहुणे मंडळी हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. पण हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालेला पाहून तुम्ही नक्कीच पाच ते दहा मिनिटे हसतच बसाल. घरच्यांनी आपल्याला शोभेल असा जोडीदार निवडला नाही, याचा राग तिने बाहेर काढला.

सोशल मीडियात वेगवेगळ्या कमेंट्स

सोशल मीडियात या व्हिडीओवर धम्माल कमेंट्सचा पाऊस पडत आहे. वधूने इतका थयथयाट का केला, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नवरदेवाचा वर्ण काळा आहे. कदाचित, त्यावरूनच वधूची चिडचीड झाली असावी, असा अंदाज अनेकजण वर्तवित आहेत. काहींनी तिचा हा थयथयाट स्वाभाविकच असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रचंड व्हायरल केला जात आहे. (Seeing the bridegroom, the bride became angry; Hold your stomach and laugh when you watch the video)

इतर बातम्या

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत सेनेत एकमत, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर

ठाणे महापालिकेचे श्वानांच्या लसीकरणासाठी दीडशे कोटी; राष्ट्रवादी म्हणते, आधी माणसांचं लसीकरण करा