मुंबई : तुम्ही थोडासा विचार करा, कि तुम्ही कामात व्यस्त आहात. त्याचवेळी तुमच्या ऑफिसमध्ये (OFFICE) एखादा प्राणी (ANIMAL VIDEO) आल्यानंतर तुमची अवस्था काय होत होईल, तसंच व्हिडीओत दिसत असलेल्या व्यक्तीचं झालं आहे. अचानक त्यांच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या घोरपडीने प्रवेश केला आहे. ज्यावेळी तो प्राणी कर्मचाऱ्यांना दिसतो. त्यावेळी त्यांचा गोंधळ उडाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (VIRAL VIDEO) चांगलाचं व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या चांगल्या वाईट कमेंट आल्या आहेत. विशेष म्हणजे हा प्राणी पाहून अनेकांना घाम फुटला आहे.
लोकांना घाबरवणारा हा व्हिडीओ सुरुवातीला तुम्ही पाहा. ऑफिसमध्ये असलेली लोकं प्रचंड घाबरली आहेत. काही लोकं खुर्चीवर चढली आहेत, तर काही लोकं टेबलावरती चढले आहेत. त्यावेळी त्यांच्यामधून एक मोठी घोरपड निघाली आहे. हे पाहून व्हिडीओत दिसत असलेली महिला अजून घाबरली आहे. जशी ती घोरपड जवळ येत आहे, हे पाहून ती लोकं टेबलावरती चढले आहेत. हा सगळा प्रकार तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ज्यावेळी नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यावेळी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ failarmy नावाच्या एका अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यात शेअर करण्यात आला होता. त्याचबरोबर 31 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहून हा लोकं विविध प्रकारच्या कमेंट करीत आहेत.
सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकांना हा व्हिडीओ मजेशीर घेतला आहे. अशा पद्धतीचे सोशल मीडियावर यापुर्वी सुध्दा व्हायरल झाले आहेत.