मुंबई : कोव्हिड लसीची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे सीईओ अदार पूनावाला (Serum Institute CEO Adar Poonawala) यांनी लंडनमध्ये एक बंगला भाड्याने घेतला आहे. लंडनमधील उच्चभ्रू मेफेअर (Mayfair) भागात हा आलिशान बंगला आहे. या बंगल्याचे एका आठवड्याचे भाडे 50 हजार पाऊंड म्हणजे अंदाजे 50 लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. (Serum Institute CEO Adar Poonawala rents London Bungalow for 50 Lacs per week)
पोलंडच्या अब्जाधीशाकडून बंगला भाड्यावर
ब्लूमबर्ग क्विंट वाहिनीच्या वेबसाईटवर यासंबंधी वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. पोलंडचे अब्जाधीश डॉमिनिका कुलझाईक यांच्याकडून पूनावालांनी ही प्रॉपर्टी भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती आहे. या डीलविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. अदार पूनावालांनी आपले नाव उघड होऊ नये, याची काळजी बाळगल्याचंही बोललं जातं.
बंगल्यामध्ये नेमकं काय काय?
अदार पूनावाला यांनी भाड्यावर घेतलेला हा मेन्शन मेफेअर भागातील सर्वात महागडी प्रॉपर्टी असल्याची चर्चा आहे. हा बंगला जवळपास 25 हजार चौरस फूट जागेवर पसरला आहे. त्यासोबतच एक गेस्ट हाऊसही आहे. मेफेअर भागातील रहिवाशांसाठी असलेल्या सिक्रेट गार्डनला जाण्याचा मार्गही तिथे आहे.
भाड्याचे दर 9.2 टक्क्यांनी घटले
मध्य लंडनमधील लक्झरी होम मार्केटला बूस्ट मिळण्याच्या दृष्टीने या डीलकडे पाहिले जाते. ब्रेक्झिट आणि कोरोना महामारीचा मार्केटला मोठा फटका बसला आहे. LonRes या प्रॉपर्टी डेटा कंपनीच्या माहितीनुसार पूनावालांनी जिथे बंगला भाड्याने घेतला आहे, तिथे गेल्या पाच वर्षांत भाड्याचे दर 9.2 टक्क्यांनी घटले आहेत. (Serum Institute CEO Adar Poonawala rents London Bungalow for 50 Lacs per week)
पूनावालांचे ब्रिटनशी जुने संबंध
अदार पूनावाला यांचे ब्रिटनशी जुने संबंध आहेत. पूनावाला यांनी वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले आहे. याआधी मेफेयर भागातील ग्रोसवेनर हॉटेल खरेदी करण्यास ते उत्सुक होते. ब्रिटनमध्ये आपलं दुसरं घर असावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
कोरोना लसीमुळे पूनावाला लोकप्रिय
‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोनावरील लस जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने तयार केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनावर कंपनीने ही लस विकसित केली आहे. जगाला या साथीच्या आजारापासून वाचवण्यात ‘कोव्हिशिल्ड’ ही लस मोठी भूमिका बजावत आहे. या लसीमुळे ‘सीरम’ कंपनीचे मालक अदर पूनावालांबद्दल सगळ्यानांच माहित झाले आहेत. ते या कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक म्हणजेच सीईओ आहेत.
संबंधित बातम्या :
‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या संचालिका नताशा पूनावालाही सोशल मीडियावर चर्चेत
(Serum Institute CEO Adar Poonawala rents London Bungalow for 50 Lacs per week)