मुंबई : सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडीओ, फोटो व्हायर होत असतात. या फोटो आणि व्हिडीओची चर्चा देखील होते. असाच एक फोटो (photo) काँग्रेसचे नेते शशी थरुर (Congress Shashi Tharoor) यांच्या बालपणीचा व्हायरल होत आहे. हा फोटो थरुर यांच्या बालपणीचा असल्याचं नेटिझन्सकडून बोललं जातंय. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेही रंगल्या आहे. शशी थरुर हे बालपणी चित्रपटात काम करत होते का, ते आजही तसेच दिसतात का, अशा शेकडो प्रश्नांचा पाऊस नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पाडला आहे. अशातच या फोटोवर अनेक रंजक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. तर अनेकांनी थरुर यांचं कनेक्शन थेट चित्रपट सृष्टीशी जोडलंय. आता सोशल मीडियावर नेमका कोणता फोटो व्हायरल होतोय, हा फोटो खरंच शशी थरुर यांचा आहे का, हा फोटो नेमका कुठून मिळाला, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत.
लेखक वैभव विशाल यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोवर असा दावा केला गेला की, यामधील मुलगा हा काँग्रेसचे नेते शशी थरुर आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळे तर्क लढवले. या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या. शशी थरुर यांनी देखील यावर लवकर या फोटोवर भाष्य केलं नाही. लेखक वैभव विशाल यांनी एक ब्लॅक आणि व्हाईट फोटो टाकला आहे. यावर त्यांनी दावा केला की या फोटोमध्ये दिसणारे शशी थरुर आहेत. यावर काँग्रेसचे नेते शशी ठरूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे थरुर यांची प्रतिक्रिया येण्यापूर्वी या फोटोवर अनेक तर्कवितर्क लढवले गेले.
While @ShashiTharoor never was in Andaz Apna Apna, he did act in movies as a child star. His screen name was Master Gyaan, and he did 9 Hindi and Malayalam films. Attaching a still from Jailor with Geeta Bali.
Today was just the right day to revisit this picture. Go, Shashi! ? pic.twitter.com/VZS4vwiEs2
— Vaibhav Vishal (@ofnosurnamefame) April 1, 2022
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी लेखक विशाल यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘मी नेहमी हा फोटो आणि त्याविषयी काही बोलत नाही. ही गोष्ट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न मी केला होता. हा खूप चांगला प्रयत्न होता, आजही मला मास्टर ज्ञानच्या भूमिकेतून लोक ओळखतात.’
An I had tried to keep it secret all along! Good sleuthing @ofnosurnamefame ! Btw I am still known as Master Gyaan… https://t.co/8mK8A8qRmH
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 1, 2022
For all those folks who took this exchange seriously: It’s a joke! He is pulling my leg and I am playing along for fun. See yesterday’s date! #AprilFoolsDay https://t.co/g8JUeYJevm
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 2, 2022
लेखक वैभव विशाल यांनी फोटो शेअर केला असला तरी त्यावर त्यांनी बोललं देखील आहे. त्यांनी म्हटलंय की, ‘आज या फोटोला पुन्हा पाहण्याचा योग्य दिवस आहे. गो, शशी! कारण, शशी थरुर हे ‘अंदाज अपना अपना’मध्ये कधीच नव्हते. त्यांनी एका बालकलाकाराच्या रुपात चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांचं भूमिकेतील नाव मास्टर ज्ञान होतं. विशेष म्हणजे त्यांनी नऊ हिंदी आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केलं आहे. लेखक वैभव विशाल यांनी जो कोटो टाकला तो जेलर या चित्रपटातील आहे.
इतर बातम्या