Animals & kid video : तुम्ही मेंढ्या पाहिल्या असतील. हा एक पाळीव प्राणी आहे, जो लोकर तसेच दूध आणि मांसासाठी पाळला जातो. मेंढ्यांच्या विविध जाती जगभर आढळत असल्या तरी फक्त भारतातच मेंढ्यांच्या सुमारे 40 जाती पाहायला मिळतात. चीनमध्ये ज्या प्रकारे मानवांची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे, त्याचप्रकारे चीनमध्ये मेंढ्याही सर्वाधिक आढळतात. गाई, म्हशींप्रमाणेच ते देखील शाकाहारी आहेत, जे गवत आणि धान्य खातात. गाई-म्हशी ज्याप्रमाणे शांत स्वभावाच्या असतात त्याचप्रमाणे मेंढ्याही (Sheep) शांत स्वभावाच्या मानल्या जातात, परंतु काही वेळा त्यांचे उग्र (Aggression) रूपही पाहायला मिळते आणि त्यानंतर त्या कोणाला मारायलाही मागेपुढे पाहत नाहीत. मेंढ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लहान मुलीला त्यांच्यासोबत मस्ती करणे महागात पडले. त्यांची तिच्यावर हल्ला केला.
मुलीला पाहताच एका मेंढीला राग येते आणि नंतर ती मुलीला तिच्या डोक्यात मारते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एका मळ्यात 4 मेंढ्या उभ्या आहेत आणि एक लहान मुलगी मजा करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ जाते, परंतु एका मेंढीला काय होते, माहीत नाही, ती धावत येते आणि मुलीला जोरात दणका देते. त्यामुळे काही मुलगी अंतर जावून पडते. ही मुलगी त्यांच्यासोबत खेळण्याच्या उद्देशाने जिथे जाते, पण तिला विनाकारण त्यांच्या रागाचा सामना करावा लागतो.
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thedaily.animals या आयडीने शेअर करण्यात आला असून या मेंढीच्या हल्ल्यात मुलीला कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाख 75 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.