मुंबई : आयुष्यात प्रत्येकाला संकटाला सामोर जावं लागतं. सगळ्यांच्या समोर कधी ना कधी एक मोठं संकट उभं राहतं. प्रत्येकाला त्यातून बाहेर निघायचं असतं, सगळेचं प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला यश मिळतं असं नाही. सगळ्यात जास्त अधिक संघर्ष प्राण्यांना (Animal viral video) जंगलात करावा लागतो. त्याचे असंख्य व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल (Kruger National Park Video) झाल्याचे पाहायला मिळतात. एखादं मोठं ताकद असलेलं जनावर कधी हल्ला करेल हे कोणीचं सांगू शकतं नाही. वाघ आणि सिंह लपून कधी कोणत्या प्राण्यावरती हल्ला (animal attack video) करतील हे कोणीचं सांगू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सिंहांची एक टोळी गव्याच्या मागे लागते. त्यानंतर गव्याचा राग पाहून सिंह इकडे तिकडे पळत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक गवा दहा सिंहांना भारी पडला आहे. त्या व्हिडीओमध्ये पाण्याच्या शेजारी एक गवा पाणी पिण्यासाठी आला आहे. त्यावेळी तिथं असेलली सिंहांची टोळी गव्याची शिकार करण्याच्या नादात आहे. ते गव्याच्या आजूबाजूने फिरत हल्ला करण्याच्या इराद्याने फिरत आहेत. परंतु चिडलेला गवा आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्याशी भिडत आहे. एकटा गवा सगळ्या सिंहांना भारी पडला आहे. सिंहांच्या टोळीने तिथं हार मानली आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर लोकांनी त्या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा केल्या आहेत.
हा व्हिडीओ एंटोनी ब्रिट्ज़ यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ साऊथ आफ्रिका देशातील क्रूगर नॅशनल पार्कमधील असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी कमेंट सुध्दा चांगल्या वाईट केल्या आहेत. काही लोकं दिवस चांगला जाण्यासाठी प्राण्यांचे चांगले व्हिडीओ शोधत असतात. हा व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करेल एवढं मात्र नक्की.