भारतीयांनी ब्रेकफास्टला हेच खायला हवे का ? प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची एअर इंडीयावर तिखट टीका

| Updated on: Feb 27, 2023 | 7:06 PM

एअर इंडीयाला अलीकडेच टाटा कंपनीने सरकारकडून ताब्यात घेतले आहे. तसेच एअर इंडीया आपल्या ताफ्यात लवकरच नविन विमानांचा समावेश करणार आहे. परंतू एअर इंडीयाच्या सेवेवर टीकाही होत आहे.

भारतीयांनी ब्रेकफास्टला हेच खायला हवे का ? प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची एअर इंडीयावर तिखट टीका
AIR INDIA
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी नागपूर ते मुंबई प्रवासात एअर इंडीयाने दिलेल्या ब्रेकफास्टवर नाराजी व्यक्त करीत एअर इंडीयाला ( AIR INDIA ) सुधरण्याचा सल्ला दिला आहे. भारतीयांनी ब्रेक फास्टला हेच खायला हवे का असा सवाल त्यांनी समाजमाध्यमावर केला आहे आणि त्यांना मिळालेल्या ब्रेकफास्टचा ( breakfast ) फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टने अनेक प्रतिक्रीया समाजमाध्यमावर व्यक्त करण्यात येत आहेत. गेल्याच आठवड्यात तृणमुलच्या खासदारांनी एका एअरलाईनच्या जेवणावर टीका केली होती.

टीव्हीवरील अनेक कुकरी शोजचे होस्ट प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी त्यांना नागपूर ते मुंबई विमान प्रवासात एअर इंडीयाने दिलेल्या नाश्त्यावर सोमवारी तिखिट टीका केली आहे. या ब्रेक फास्टवर असमाधान व्यक्त करीत संजीव कपूर यांनी भारतीयांना हाच नाश्ता करावा का असा सवाल त्यांनी केला आहे. संजीव कपूर यांनी आपल्या विधानाचा पुरावा म्हणून एअर इंडीयात त्यांना सर्व्ह केलेल्या नाश्त्याचा फोटोच ट्वीट केला आहे.

 

या पोस्टमध्ये त्यांनी या ब्रेक फास्टमध्ये दिलेल्या पदार्थांचे वर्णन केले आहे. थंड पडलेला चिकन टीक्का, सॅंडविचला पुरेसे फिलींग लावलेले नव्हते. डेझर्ट शुगर सिरप सारखे होते असे ट्वीटरवरील तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. नागपूर ते मुंबई फ्लाईट क्रमांक – 0740  असा ब्रेक फास्ट दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. थंड चिकन टीक्का, कलिंगड काकडी, कोबीच्या पानाला मायो लावून त्यावर शेवचे तुकडे आणि काही फिलींग न केलेल्या सॅंडविचचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. आणि एअर इंडीला त्यांनी जागे व्हा असा सल्ला दिला आहे.

खासदाराला जेवणात सापडला होता केस 

गेल्याच आठवड्यात तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी एमेरेट्सच्या फ्लाईटमध्ये दिलेल्या नाश्त्यात चक्क  केस सापडल्याचा फोटो त्यांनी समाजमाध्यमावर शेअर केला होता. विमानप्रवासात सेलीब्रिटींना आलेल्या या दोन वेगवेगळ्या अनुभवाचा प्रकार त्यांनी समाजमाध्यमावर शेअर केल्याने विमानातील महागड्या प्रवासात दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल चर्चेला सुरूवात  झाली आहे. एअर इंडीयाला अलीकडेच टाटा कंपनीने सरकारकडून ताब्यात घेतले आहे. तसेच एअर इंडीया आपल्या ताफ्यात लवकरच नविन विमानांचा समावेश करणार आहे.