मुंबई : लग्नातील (married) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)पाहायला मिळातात. त्यामध्ये अनेकदा डान्स केलेले व्हिडीओ असतात. घरच्या लग्नात अनेक महिला मनमुराद नाचताना पाहायला मिळतात. काही महिला डान्सची प्रॅक्टिस करुन डान्स करतात असं पाहायला मिळालं आहे. तसेच काहीवेळा पैपाहुणे सुद्धा नाचताना पाहायला मिळतात. दीराच्या लग्नात वहिनीने धुमाकूळ घातल्याचा एक व्हिडीओ सोशल (Dance Video) मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
‘लो चली मैं अपनी देवर की बारात लेके…’ या गाण्यावर वहिनीने दीराच्या लग्नात जोरात ठुमके लगावले आहेत. त्यावेळी नवरा लग्नाची कपडे घालून घोड्यावर बसला आहे. वहिनी दिराच्या लग्नात जोरात डान्स करीत आहे. आजूबाजूचे लोकं वहिनीचा डान्स पाहून बावरले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून लोकांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिल्याचं सांगितलं आहे. काही लोकांना हा व्हिडीओ अधिक आवडल्याचं सुध्दा सांगितलं आहे.
theviralvichar या युजरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. साडे तीन हजार लोकांनी त्यावर कमेंट केली आहे. त्याचबरोबर काही जणांनी नाचत असलेल्या महिलेला सल्ला देखील दिला आहे.