Wild Animal Video : सोशल मीडियावर विविध प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ खूपच गोड असतात. विशेषत: पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. दुसरीकडे जंगली प्राण्यांचे व्हिडिओ. ते आपल्याला हसवत नाहीत, मात्र त्यामुळे आपल्याला भीती नक्की वाटते. जंगली प्राण्यांमधला अत्यंत धोकादायक, जीवघेणा असा प्राणी म्हणजे साप (Snake). अनेकांना नाव काढलं तरी भीती वाटते. विचार करा तर तो तुमच्या समोर आला तर… आता व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ (Video) पाहा. यात तर साप समोर दिसत आहे. क्वालालंपूरहून आलेल्या एका फ्लाइटमध्ये विमानाच्या प्रकाशित भागात (दिव्यात) साप लटकताना आढळला. त्यानंतर प्रवाशांचे काय हाल झाले असतील, हा विचार न केलेलाच बरा. अनेकांची घाबरगुंडी उडाली असेल.
ट्विटरवर शेअर
एअर एशिया एअरबस A320-200 हे क्वालालंपूरहून मलेशियाच्या तवाऊ येथे जात होते. ही छोटी क्लिप मूळतः व्यावसायिक पायलट हाना मोहसिन खान यांनी ट्विट केली होती. त्या फ्लाइट मॅनिंग करत होत्या, की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र व्हिडिओ धडकी भरवणारा आहे. यूझर्सनी त्यावर कमेंट्सही केल्यात.
Yikes!
Snake on a plane!
Either an escaped pet from passenger carry on/luggage or possibly climbed its way into the aircraft from the ground.Air Asia Airbus A320-200,Kuala Lumpur to Tawau.
This dude happily stayed inside the illuminated area till plane was diverted? pic.twitter.com/jqopi3Ofvp— Hana Mohsin Khan | هناء (@girlpilot_) February 12, 2022
घरालाच लावली आग
अमेरिकेतील मेरीलँडमधील एका व्यक्तीने सापांपासून सुटका करण्याच्या प्रयत्नात चुकून आपल्या घराला आग लावल्याचे सांगितले जात आहे. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, तो माणूस जळत्या कोळशाचा धूर वापरून सापांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याऐवजी, 10,000 चौरस फुटांचे घर आगीत जळून खाक झाले.
Id have lost it and run off the flight. Good lord thr site of it freaked me out.
?????
— Jeevika (@jeevika_shiv) February 12, 2022
I would freak out!!
— Sadho (@sadhosays) February 12, 2022
I hope Hissss flight was comfortable.
— TheBoringGuy (@NurulQuamar) February 12, 2022
आणखी वाचा :