सोलापूर : जिल्ह्यातील विजापूर-सोलापूर रोडवर एक वेगळीच घटना घडली आहे. या रस्त्यावरील संभाजी महाराज तलावाजवळ एक ट्रक उलटल्यामुळे ट्रकमध्ये असलेले मासे पकडण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली. फक्त जिवंत आणि ताजे मासे खायला मिळतील या आशेने हे लोक थेट नाल्यामध्ये उतरले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो चांगलाच व्हायरल होत आहे. (Solapur people gathered to collect fish from nala video goes viral)
नाल्यात मासे कोठून आले ?
मुळात सोलापूरमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये मासे नेमके कसे आले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण विजापूर सोलापूर रोडवर संभाजी महाराज तलावाजवळ असलेल्या नाल्यात मासे काही नैसर्गिकरीत्या आले आहे. ताज्या आणि स्वादिष्ट माशांनी भरलेला एक ट्रक येथून जात होता. यावेळी पुलावरुन जाताना ट्रकला अचानक अपघात झाला. या अपघातामुळे चाकलाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक थेट उलटला आणि सर्व मासे थेट पुलाखालच्या नाल्यात जाऊन पडले. मासे अगदीच जिवंत असल्यामुळे ते नाल्यामध्ये तसेच नाल्याच्या बाहेर तडफडत होते.
काही क्षणांत लोकांची गर्दी, मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड
माशांनी भरलेला ट्रक उलटल्याचे समजल्यानंतर ही बातमी आजूबाजूच्या लोकवस्तीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काही क्षणांत येथे बघ्यांनी गर्दी केली. उलटेल्या ट्रकमध्ये तसेच नाल्यामध्ये सगळे जिवंत मासे होते. त्यानंतर नाल्यामध्ये पडलेले मासे पकडता येऊ शकतात हे समजल्यावर येथे आणखी लोकांची गर्दी उसळली. त्यानंतर महिला, तरुण, तसेच माणसांनी या नाल्यामध्ये उतरुन कोणतीही काळजी न घेता मासे पकडणे सुरु केले. मासे पकडण्यासाठी येथे काही क्षणांत लोकांची झुंबड उडाली. मासे पकडण्यासाठी काहींनी घरुन चक्क पोते आणि गोण्यासुद्धा आणल्या होत्या.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, लोकांनी येथे चांगलीच गर्दी केल्यामुळे मासे पकडण्याचा हा उद्योग चांगलाच व्हायरल झाला. लोक जिंवत मासे पकडण्यासाठी कसे धडपडतायत हे पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे.
इतर बातम्या :
VIDEO | सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… डोक्यावर पदर सावरत गाणाऱ्या आजींचा गोड व्हिडीओ पाहिलात?
(Solapur people gathered to collect fish from nala video goes viral)