वाशिम : वाशिम येथील सायकलपटू नारायण व्यास (Narayan Vyas) यांनी वाशिम ते रामसेतू ही सायकल यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा सुप्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद (Sonu Sood) यांना समर्पित केली आहे. सोनू सूद यांनी व्यास यांच्या उपक्रमाचं कौतुक करत हे आपले सर्वात मोठे यश असल्याचं म्हटलं आहे. (Sonu Sood praises Washim Cyclist Narayan Vyas)
अभिनेते सोनू सूद यांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेल्या हजारो कुटुंबाना मदत केली होती. त्यांच्या कार्याने प्रेरीत होऊन वाशिम येथील नारायण व्यास भारताच्या दक्षिण टोकाकडील शेवटचा भूभाग असलेल्या रामसेतू येथे जाण्यासाठी निघाले.
पाच राज्यांमधून होत असलेली नारायण व्यास यांची ही सायकल यात्रा तब्बल 2000 किलोमीटरची असणार आहे. सायकलपटू नारायण व्यास यांनी काल पहिल्या दिवसाच्या राईडमध्ये 250 किमी सायकलिंग पूर्ण केली आहे.
@SonuSood Ride for Real Hero of india 2000 km Centre India toThe last land of India Ram Setu.Real Hero SonuSood has emerged as a true hero in dark times. Now our Turn to salute his work thank you so much for helping people in dark time.Cyclist Narayan Vyas from washim Maharashtra pic.twitter.com/Xy9V3tQRfm
— Narayan Vyas (@Narayan19171470) January 27, 2021
नारायण व्यास यांचा पहिला मुक्काम तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे आहे. विशेष म्हणजे वाशिम ते रामसेतू ही सायकल यात्रा सात दिवसांमध्ये पार करणार असल्याचे व्यास यांनी सांगितले. त्यानंतर सोनू सूद यांनी व्यास यांच्या उपक्रमाचं कौतुक करत हे आपले सर्वात मोठे यश असल्याचं म्हटलं आहे.
2000 kms..……???
Thanks Narayan.
This is my biggest award. ?? https://t.co/nnmX1xniJ9— sonu sood (@SonuSood) January 27, 2021
अनधिकृत बांधकामप्रकरणी अडचणीत सापडलेल्या अभिनेता सोनू सूदला सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला आहे. सोनू सूदवर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला दिले आहेत. कोर्टाने दिलासा दिल्यानंतर सोनूनेही याचिका मागे घेऊन पालिकेकडेच जाऊन हा वाद सोडवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी हा चांगला निर्णय असल्याचं म्हणत सोनूचं कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या:
अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नका; सुप्रीम कोर्टाचे पालिकेला आदेश; सोनू सूदला दिलासा!
Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
(Sonu Sood praises Washim Cyclist Narayan Vyas)