मुंबई : सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. त्यामुळे गावात आणि शहरात कुणाच्या नातेवाईकाचे किंवा ओळखीच्या लोकांच्या आपण लग्नाला जात असतो. लग्नाच्या संबंधित अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Bride Viral Video) झाला आहे, तो पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरतं नसल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यस्थानमधील (Rajsthan) बारांमध्ये सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Trending video) झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गुटखाचं व्यसन असलेल्या वधूला तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. लग्न झाल्यानंतर नववधूने लगेच देशी स्टाईलमध्ये सगळ्यांच्यासमोर गुटखा खाल्ला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपलं डोकं पकडलं आहे. ज्यावेळी मुलीचं लग्न असतं त्यावेळी ती लाजलेली किंवा घाबरली असल्याचं पाहायला मिळते. परंतु सध्याचा व्हिडीओ पाहून अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करीत आहेत.
26 मेला राजस्थानमधील बारां या ठिकाणी सामूहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 2 हजार 222 जोडप्यांची लग्न लावून देण्यात आली. अधिक लोकांची लग्न लावल्यामुळं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड नोंद केली आहे. त्यामध्ये एका नववधूचा दबंग आणि गावठी स्टाईल लोकांना अधिक आवडली आहे. लग्न झाल्यानंतर तलफ झाल्याने नवरी सगळ्यांच्यासमोर गुटखा खाल्ला आहे.
Baran: विवाह संपन्न होते ही दुल्हन ने खाया गुटखा,.?? pic.twitter.com/dmX510bHBu
— SYED SHOEB (@SyedSho43211335) May 29, 2023
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नववधू लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती चांगलाचं शेअर झाला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ काही लोकांनी चांगल्या कमेंट केल्या आहेत. तर काही लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.