शिजियाझुआंग : Zulu King goodwill Zwelithini dies: दक्षिण अफ्रिकेच्या जुलु राष्ट्राचा पारंपरिक राजा गुडवील ज्वेलिथिनी (zulu king goodwill zwelithini) यांचा वयाच्या 72 व्या वर्षी नुकताच मृत्यू झाला. मागील एक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. जुलु येथील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार किंग गुडविल यांना डायबिटिजचा त्रास होता. या कारणामुळे किंग गुडवील यांची प्रकृती बिघडलेली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. (south africa zulu king goodwill zwelithini dies have five wives and 28 children)
दक्षिण आफ्रीकेच्या जुलु राष्ट्राचे किंग गुडवील हे पारंपारिक नेते होते. पारंपरिक नेता असल्यामुळे त्यांनी कोणतेही राजकीय नेतपद स्वीकारले नाही. असं म्हटलं जातं की त्यांच्या संपूर्ण हयातीत जुलुमधील 1.20 कोटी लोकांवर त्यांचा प्रभाव कायम राहिला. त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या शासनकाळात असे काही निर्णय घेतले, प्रथा सुरु केल्या ज्यामुळे वाद निर्माण झाला होते. या राजाला एकूण सहा बायका आहेत. तसेच या सहा पत्नींपासून या राजाला 28 मुलं झाली. वयाच्या 65 व्या वर्षी या राजाने स्वाजीलँड या देशाची राणी जोला माफूसोबत लग्न केले होते.
किंग गुडवील ज्वेलिथिनीचे वडील बेकुजुलु कासोलोमन यांचा मृत्यू 1968 मध्ये झाला. त्यानंतर जुलु राष्ट्राची सत्ता गुडवील ज्वेलिथिनी यांच्याकडे आली. मात्र, हत्येच्या तसेच घातपाताच्या भीतीमुळे ज्वेलिथिनी यांना तीन वर्षे त्यांच्या जुलु देशाच्या बाहेर राहावे लागले होते. या तीन वर्षांच्या काळात प्रिंस इजरायल मैक्वेजिनी यांनी जुलु देशाची गादी सांभाळली होती. त्यानंतर 3 डिसेंबर 1971 ज्वेलिथिनी यांनी औपचारिक पद्धतीने जुलु देशाचा राज्यकारभार स्वीकारला.
किंग गुडवील ज्वेलिथिनी या राजाने त्याच्या आयुष्यात अनेक विवादास्पद निर्णय घेतले. या राजाने रीड डांस फेस्टीव्हल पुन्हा सुरु केला. या फेस्टिव्हलमध्ये व्हर्जीन मुली अर्धनग्न होऊन राजासमोर नृत्य करतात. 1984 मध्ये हा डान्स फेस्टिव्हल सुरु करण्यात आला. किंग गुडवील यांच्या संपूर्ण हयातीत हा फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
दरम्यान, हा राजा समलैंगिक जोडप्यांची घृणा करायचा असेही म्हटले जाते. किंग गुडवील ज्वेलिथिनी समलैंगिक लोकांना किड्यासमान मानायचा. तसेच दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या गुन्ह्यांना बाहेरचे लोक जबाबदार असून त्यांना हाकलले पाहिजे असेही व्यक्तव्य या राजाने केले होते. या वक्तव्यानंतर जुलूमध्ये आफ्रिकी लोकांवर हल्ले वाढले होते. या व अशा अनेक प्रकारामुळे हा राजा नेहमीच चर्चेत राहिला.
इतर बातम्या :
अबब! तब्बल 10 कोटी 26 लाखाला विकली गेली ‘पवित्र’ व्हिस्की, काय आहे खास?
1 अंडे 30 रुपयाला, साखर 81 रुपये किलो, पाकिस्तानात 1 किलो मटणाचा दर किती?
(south africa zulu king goodwill zwelithini dies have five wives and 28 children)