लग्नाच्या विधी सुरु असताना स्टेजला आग, भाऊ वधूला वाचवण्यासाठी धावला, पण वराच्या कुतीमुळे लोकं संतापले

| Updated on: Mar 30, 2023 | 9:32 AM

नवरा-नवरी एकामेकांना हार घालणार होते. परंतु त्याचवेळी तिथं स्टेजला आग लागली. लागलेली आग पाहून सगळे एकदम घाबरुन गेले, त्याचवेळी नवरीच्या भावाने तिथली आग विझवली.

लग्नाच्या विधी सुरु असताना स्टेजला आग, भाऊ वधूला वाचवण्यासाठी धावला, पण वराच्या कुतीमुळे लोकं संतापले
wedding viral video
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका लग्नातील व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. कधी नवरी, तर कधी नवऱ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी नवऱ्याचे मजेशीर डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) होतात. तर नवरीचे आणि तिच्या मैत्रीणीचे व्हायरल व्हिडीओ पाहायला लोकांना पाहायला आवडतात. काही व्हिडीओ असे असतात की, त्यामुळे लोकांना अधिक त्रास होता. विशेष म्हणजे लग्नातील भांडण, आगीची घटना, अपघात यामुळे अनेक निराश झाल्याचे पाहायला मिळतात, सध्या लग्नाला गेलेल्या अनेक गाड्यांचे अपघात (Vehicle Accident) होत असल्याचे घटना घडत आहेत.

नवरीच्या भावाने स्टेजवरती जाऊन…

इंटरनेटवरती सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरा-नवरी एकमेकांना हार घालणार आहेत. तेवढ्यात स्टेजच्यावरच्या बाजूला आग लागते. ती आग पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो. त्याचवेळी नवरीचा भाऊ स्टेजवरती जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतो. नवरीचा भाऊ आपल्या ब्लेझरने आग विझवतो. परंतु त्याचवेळी नवरा-नवरीच्या हातात घालून गप्पा मारत आहेत. विशेष म्हणजे नवरा आणि नवरी दोघेही हसून-हसून गप्पा मारीत आहेत.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ आतापर्यंत पाच लाख लोकांनी लाईक केला

नवऱ्याच्या अशा कृतीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर लोकांनी नवरीच्या भावाची अधिक तारीफ केली आहे. तर नवऱ्याच्याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. नवरा सगळं स्टेजवरती आरामात पाहत आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती sachkadwahai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत पाच लाख लोकांनी लाईक केला आहे. त्याबरोबर हजारोंच्या संख्येने त्या व्हिडीओला कमेंट सुध्दा आल्या आहेत.