मुंबई : आपल्या देशात लोकांना बाहेरचं आणि चांगलंचुंगलं खायची सवय आहे. त्यामुळे त्यांना एखादा नवा पदार्थ खायला मिळाला (Street Vendor) की, ते त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात असं अनेकदा दिसून आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल (video viral on social media) झाला आहे. त्यामुळे एक नवी चर्चा देखील सुरु झाली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा त्याचा धक्का बसणार आहे, एवढं मात्र नक्की. एका खाण्याच्या पदार्थाचा (Tandoori Chicken) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्यावर कमेंट सुध्दा अधिक येत आहेत.
ट्विटरवरती मोहम्मद फ्यूचरवाला नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामध्ये एक आईस्क्रिम विक्रेता चिकन आइसक्रीम बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रेता पहिल्यांदा चिकन तव्यामध्ये टाकून भाजून घेत आहे. त्यानंतर त्यावर दूध टाकलं जात आहे. चिकन आणि दूध मिक्स केल्यानंतर चॉकलेट चिप्स, चॉकलेट सिरप टाकून मिक्स केलं जात आहे. हे मिश्रण तव्यावर पसरवल्यानंतर ते आईस्क्रीम सर्व्हिंग कपमध्ये टाकून ठेवत आहे.
Found a perfect hack to beat the summer heat
Presenting protein rich tandoori chicken ice cream for one and all
??? pic.twitter.com/d3m97kC2YC
— Mohammed Futurewala (@MFuturewala) April 12, 2023
सोशल मीडिया या व्हिडीओला पाहून चांगल्या आणि वाईट कमेंट करीत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अल्लाह तुम्हाला माफ करणार नाही. या कारणामुळे लोकं एलर्जीचे शिकार होत आहेत. दुसरा नेटकरी म्हणतो की, बापरे, हे सगळं आम्हाला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ व्हायल झाले आहेत. खाण्याचे काही व्हिडीओ लोकांना अधिक आवडले आहेत, तर काही लोकांनी त्यावर टीका केली आहे.