पेपर गणिताचा, उत्तरं मात्र… त्या विद्यार्थ्याची मार्कशीट सरांनीच केली व्हायरल! त्याने लिहिलं तरी काय ?

| Updated on: Jul 08, 2024 | 3:00 PM

वर्गातील ढ मुले कधी काय करतील याचा नेम नाही. परीक्षेत कॉपी करून पास होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यातही यश आलं नाही तर काहीबाही लिहून हे लोक मोकळे होतात. कोणी पास करण्याची विनंती करतं, कोणी कविता लिहितं तर कोणी गरीबीचा हवाला देऊन गयावया करतं. एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे, त्यात त्याने चक्क...

पेपर गणिताचा, उत्तरं मात्र... त्या विद्यार्थ्याची मार्कशीट सरांनीच केली व्हायरल! त्याने लिहिलं तरी काय ?
Image Credit source: social media
Follow us on

प्रत्येक वर्गात दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. पहिल्या प्रकारचा विद्यार्थी मेहनत करून यश मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी हे काही तरी जुगाड करण्यावर भर करत असतो. कॉपी करून पास होण्याचा त्यांचा प्रयत्न करत असतो. त्यात काही लोक यशस्वीही होतात. तर काहींना नकल करण्याचीही अक्कल नसल्याचं दिसून येतं. अनेकदा तर कॉपी करणारे विद्यार्थी पेपरात काहीबाही लिहून मोकळे होतात. त्यामुळे शिक्षकही हैराण होतात. मग अशा लोकांची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आणि या विद्यार्थ्यांचा कचरा होत असतो. एका विद्यार्थ्याने त्याच्या उत्तरपत्रिकेत असंच काहीसं लिहिलंय. आता त्याची ही उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे ही उत्तरपत्रिका ज्याच्या हातात पडते तो पोट धरून हसल्याशिवाय राहत नाही.

परीक्षा संपलेल्या आहेत आणि निकालही लागले आहेत, हे आपण सर्व जाणतो आहोत. या परीक्षांमध्ये अनेक मुले पास झाली आहेत आणि वरच्या वर्गातही गेली आहेत. पण विद्यार्थ्यांच्या एक्झाम शीट अजूनही व्हायरल होताना दिसत आहेत. या उत्तरपत्रिका मजेदार आहेत. तुम्ही इंटरनेटवर ॲक्टिव्ह असाल तर तुम्हालाही ही उत्तरपत्रिका पाहायला मिळेल. एका विद्यार्थ्याची ही उत्तरपत्रिका आहे. त्यात त्याने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सोबतच बरंच काही लिहिलं आहे. बरं हा गडी पेपर लिहिताना एकदमच शायर झाल्याचं दिसत आहे. या शायराना अंदाजातूनच त्याने त्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मार्क्स किती?

या व्हिडीओत शिक्षक आणि विद्यार्थी दिसत आहे. शिक्षक विद्यार्थ्यााला उत्तरपत्रिका दाखवताना दिसत आहे. मुलाचं नाव हर्ष बेनीवाल असल्याचं ते सांगत आहे. या विद्यार्थ्याला MCQs मध्ये 18 मार्क्स मिळाले आहेत. एका प्रश्नाला पाच मार्क्स मिळाले आहेत. या शिवाय या विद्यार्थ्याने काही इतर प्रश्नही सोडवले आहेत. त्यात त्याला दीड ते दोन मार्क्स मिळाले आहेत. या मुलाच्या गुणांची गोळाबेरीज केली तर 26.5 झाली आहे. पण शिक्षकाने ते राऊंड फिगर करून 27 केले आहेत.

 

शिकून सवरून काय करायचं?

शेवटी या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने जाता जाता वैतागून एक गोष्ट लिहिली आहे. त्यामुळेच ती वाचताना सर्वांना हसू फुटतं. शिकून सवरून काय करायचं आहे? एक दिवस तर मरायचं आहे. तरीही पास होण्याची इच्छा आहे, असं त्याने या उत्तरपत्रिकेत म्हटलं आहे. विशेष म्हणजे ही शायरी वाचल्यावर शिक्षकही त्याला म्हणतात, बेटा तुला पास केलंय. हा व्हिडीओ शिक्षकानेच इन्स्टाग्रामवर व्हायरल केला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हातोहात व्हायरल करताना दिसत आहेत.