मुंबई : आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी विद्यार्थी (Student) चांगल्या शहरात जाण्याचं स्वप्न पाहत असतात. चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, परंतु आल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे आपाणास आतापर्यंत अनेकदा पाहावयास मिळालं आहे. एका हॉस्टेलमधील (hostel) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये मिळत असलेलं जेवण कशा पद्धतीचं आहे. हे एका मुलीनं व्हिडीओच्या (viral video) माध्यमातून दाखवलं आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट सुध्दा आल्या आहेत.
हॉस्टेल सोडून जे तरुण भाड्याने घर घेऊन राहतात, ते तरुण भूक लागल्यानंतर अनेकदा मॅगी सारखं फास्ट फूड खात असतात. पण हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या तरुणांना कमी त्रास होतो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक विद्यार्थीनी हॉस्टेलमध्ये मिळत असलेल्या जेवणाची गुणवत्ता दाखवत आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण हॉस्टेलमध्ये राहण्यास तयार देखील होणार नाहीत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ साक्षी जैन नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या हॉस्टेलच्या रुममध्ये मिळालेल्या जेवणाचा दर्जा दाखवत आहे. विशेष म्हणजे त्या मुलीच्या हातात पराठा आहे. ती पराठा जोरजोरात तिथं असलेल्या टेबलावरती आपटत आहे. पण त्या विद्यार्थींनीच्या हातात असलेला पराठा अजिबात तुटत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केली आहे.
Hostel ka khana? pic.twitter.com/8FiLCwtZ33
— Sakshi Jain • Content Strategist (@thecontentedge) February 16, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत हा व्हिडीओ सोशस मीडियावरती 30 हजार लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवरती प्रत्येकवेळी नव्याने कमेंट येत आहेत. एका नेटकऱ्याने त्यामध्ये आर्यन अधिक असल्याचं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने हा पराठा नेमका किती दिवसाचा आहे अशी कमेंट केली आहे.