कुत्र्यासाठी महिलेने सोडली लाखो रुपयांची नोकरी, कारण त्याला हवा होता तिचा सहवास

| Updated on: Aug 07, 2023 | 9:23 PM

आपली नाराजी व्यक्त करत होता. घरी परत गेल्यावर तिच्याशी बिलगत होता. प्रेम व्यक्त करत होता.

कुत्र्यासाठी महिलेने सोडली लाखो रुपयांची नोकरी, कारण त्याला हवा होता तिचा सहवास
Follow us on

कुत्रा मानवाचा चांगला दोस्त आहे. कुत्रा घराचे रक्षण करतो. बरेच लोकं कुत्र्याला आपल्या घरचा भाग समजतात. मुलांसारखा सांभाळही केला जातो. पण, तुम्ही असं कधी ऐकलं का की, कुत्र्यासाठी कुणी नोकरी सोडली म्हणून. तु्म्हाला ही गोष्टी थोडी वेगळी वाटेल. पण, हे खरं आहे. ही घटना आहे सिडनीतील.

आशा डीलन ही आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम करत होती. कुत्र्यासाठी तिने आपली नोकरी सोडली. डीलन म्हणते, मी कार्यालयात गेल्यावर कुत्रा माझ्या अनुपस्थितीमुळे रडत होता. आपली नाराजी व्यक्त करत होता. घरी परत गेल्यावर तिच्याशी बिलगत होता. प्रेम व्यक्त करत होता.

कुत्रे घरातील सदस्याप्रमाणे

घरी कुणी रागावले तर कुत्रा फर्नीचरच्या मागे लपत होता. हे सारं पाहून डीलनने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. डेली मेलमध्ये प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, ३० वर्षीय डीलन प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर होती. तिची सॅलरी लाखो रुपये होती. परंतु, कुत्र्यामुळे तीने नोकरीचा राजीनामा दिला. आता डीलन आपला वेळ कुत्र्यासोबत घालवते.

तणाव, चिंतेपासून मुक्तीसाठी प्राणी

डीलनने बऱ्याच मल्टीनॅशलन कंपन्यांमध्ये काम केलं आहे. तिने स्वतःची कंपनी तयार केली. ही कंपनी प्राण्यांसाठी काम करते. दुखणे, तणाव, चिंता या सर्वांवर उपाय म्हणजे प्राणी होतं. आपल्या घरचे कुत्रेही आपली काळजी घेतात. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे.

नोकरी सोडणे ही खूप मोठी गोष्ट असते. पण, एका महिलेने स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला. तोही आपल्या कुत्र्यासाठी. कारण तिला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता.