मुंबई : लग्नाचे क्षण कायम लक्षात राहावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. आता प्री वेडिंग, वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूट केलं जातं. प्रत्येक स्मरणात राहावा यासाठी फोटोग्राफर वधुवराकडे वेगवेगळ्या पोझ मागत असतो. फोटो अल्बम तयार केला जातो आणि काही वर्षानंतर त्या आठवणींना उजाळा दिला जातो. तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत चर्चा देखील रंगते. यासाठी फोटोग्राफर आपल्या संपूर्ण कौशल्य वापरून फोटोशूट करत असतो. असाच एका पोझचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फोटोग्राफरने वधुवराकडे किस करतानाची पोझ मागितली आणि फोटोग्राफरला शरमेने मागे फिरावं लागलं.
सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकरीही आवाक् झाले आहेत. वधुवर एका फोटोसाठी पोझ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, फोटोग्राफरही फोटो घेण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे. चांगले फोटो पोझ मिळावी यासाठी फोटोग्राफर दोघांना जवळ येण्यास सांगतो. तसेच किसची पोझ देण्यास सांगतो. पण त्या पोझमुळे दोघांचा संयम सुटतो.
वधुवर दोघंही एकमेकांजवळ येतात आणि किस करू लागतात. फोटोग्राफर त्यांना हात खाली करण्यास सांगतो. त्याची सूचना ऐकून ते हात खाली करतात मात्र किस करणं काही सोडत नाही. वधुवराची ही स्थिती पाहून फोटोग्राफर शरमेने मागे फिरतो. बराच वेळ अशीच स्थिती असल्याचं पाहून फोटोग्राफर पुढे येऊन त्यांना वेगळ करण्याचा प्रयत्न करतो.
हा व्हिडीओ यश ऑफिशियली 20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहे. इतकंच काय काही युजर्स या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत. व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे की, कोणते दिवस आलेत 2023 या वर्षात की फोटोग्राफरला पळावं लागतंय.