Oldest egg video : एक दिवसापूर्वीचे शिळे अन्न (Food) खाल्ल्यानंतरही आपण तोंड वेडेवाकडे करतो, परंतु एका महिलेने 100 वर्ष जुनं अंडं (Egg) खाऊन सर्वांना थक्क केले आहे. या महिलेने 100 वर्ष जुन्या अंड्याची चवही लोकांना सांगितली आहे. या महिलेने याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट (Post) केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आता याविषयी चर्चा करत आहेत. 100 वर्ष जुन्या अंड्याचे कवच अजूनही पांढरे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर त्याचा आतील भाग पूर्णपणे काळा झाला आहे. हे 100 वर्ष जुने अंडे सध्या चर्चेचा विषय आहे. लोक या अंड्याला सेंच्युरी एग म्हणत आहेत. ही अंडी माती, राख, चुना आणि मीठ यांसारख्या सामग्रीसह दीर्घकाळ ठेवली जातात. यामुळे अंड्याचा रंग बदलतो. अशा प्रकारे ठेवल्याने अंड्यातील पिवळा बलक गडद रंगाचा होतो.
अंड्याची कथा
महिलेने सांगितले, की त्याची चव सामान्य अंड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या 100 वर्ष जुन्या अंड्याची चव मलईदार झाली होती. अशी जुनी अंडी रामेन, टोफू आणि इतर सॉसमध्ये वापरली जातात. जे साइड डिश म्हणून वापरले जाते. जरी त्याच्या उत्पत्तीबद्दल अनेक दंतकथा चालू आहेत.
इन्स्टाग्रामवर पोस्ट
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिला अंड्याचे वर्णन करत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर लोकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी ही अंडी खाण्याची इच्छा व्यक्त केली. तर काही लोकांनी अंडी पाहून सांगितले, की ते मरेपर्यंत खाऊ शकत नाही. एका यूझरने सांगितले, की त्याला हे अंडे एकदा नक्की खायला आवडेल, जेणेकरून त्याची टेस्ट कळू शकेल.
आणखी वाचा :