Free tea from tap : आले (Ginger) आणि वेलची (Cardamom) चहा (Tea) खूप लोकप्रिय आहे. हिवाळ्यात बहुतेक लोकांना आल्याचा चहा प्यायला आवडतो. त्याचबरोबर उन्हाळ्यात वेलची चहा खूप प्यायला जातो. तुम्हीही चहाचे शौकीन असाल तर आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा दिवस नक्कीच जाईल. कारण लोक थंडीत चहा पिण्याचे निमित्त शोधतात. अशा स्थितीत कुठून तरी फुकट चहा मिळाला तर कसा होईल? आता हे कोण करणार असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटेल. कारण नळातून पाण्याऐवजी चहा निघत आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल, कारण तुम्ही आजपर्यंत पाण्याच्या नळातून पाणी बाहेर येताना पाहिलं असेल, पण चहा बाहेर येताना क्वचितच पाहिला असेल?
रांगेत उभे राहून घेताहेत चहा
व्हिडिओ पंजाबमधील आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात, की नळातून कसा गरम चहाचा पुरवठा केला जात आहे आणि लोक रांगेत उभे राहून नळावरून चहा घेत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेक जण याला चहा भंडारा असेही म्हणत आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर
व्हिडिओ पंजाबमधील आहे. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ashwan_gharu नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्याला 12 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, ‘भावा, मला सांग हा चहा भंडारा कुठे चालला आहे.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की मला सांगा, चहामध्ये वेलची आणि आलेही आहे का?’ हा याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल.