पप्पा मी CA झाली..वडील चहा विकतात, झोपडपट्टीत राहून मेहनतीने पोरगी सीए झाली

| Updated on: Jul 23, 2024 | 9:21 PM

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सीए झाल्यानंतर त्याच्या आईच्या गळ्यात पडून रडतानाचा हेलावणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिल्लीच्या अमिता प्रजापती या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीने सीए उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांनी बिलगलेला व्हिडीओही तितकाच भावूक आहे.

पप्पा मी CA झाली..वडील चहा विकतात, झोपडपट्टीत राहून मेहनतीने पोरगी सीए झाली
amita prajapti ca
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

‘कौन कहता है आसमाँ में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों ‘ ही प्रेरणादायक कविता दुष्यंत कुमार यांची नेहमीच संकटांना लढण्याची प्रेरणा देते. दिल्लीतील एका चहा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या हुशार मुलीने सीए सारखी अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कोणतेही संकट असो किंवा कितीही बिकट आर्थिक स्थिती असो जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही आव्हानाला सोमोरे जात यश मिळवू शकता. दिल्लीत राहणाऱ्या अमिता प्रजापती हीने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी सीए परीक्षेचा रिझल्ट जाहीर केला होता. त्यात अमिता उत्तीर्ण झाली आणि दहा वर्षांच्या कठोर मेहनतीला यश मिळाले आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मिडीयावर लोड केला आहे. या पित्याच्या आणि लेकीच्या डोळ्यांती अश्रूंचा बांध फुटलेला तुम्हाला दिसेल आणि तुम्हालाही गलबलायला होईल.

सीएची परीक्षा अत्यंत अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण सोपे नसते. दिल्लीच्या झोपडपट्टीत राहणारी अमिता प्रजापती हीच्याकडे कसल्याही सोयी सुविधा नसताना तिने मेहनतीने हे यश गाठले आहे. तिचे वडील चहा बनवितात. तिने वडीलांना ही खूशखबर दिली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. वडील देखील गहीवरुन गेले आपल्या लेकीच्या यशामुळे त्यांच्या देखील डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.हा व्हिडीओ समाजमाध्यमावरुन खूप व्हायरल झाला आहे. सोशल मिडीयावरील लिंक्डइन प्रोफाईल वरुन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

येथे पहा व्हिडीओ –

एक दिवस ती घर सोडून जाणार …

या व्हिडीओ सोबत एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. त्यात लिहीलेय की, माझ्या पप्पाला लोक म्हणायचे की तु चहा विकून मुलीला शिक्षण देऊ शकणार नाहीस, कुठपर्यंत तरुण मुलीसोबत फूटपाथवर राहणार आहेस.एके दिवशी ती सोडून जाईल तर तुझ्याकडे काही राहणार नाही.’ हा मी झोपडीत राहते मला काही कमीपणा वाटत नाही. आज मी जे काही आहे ते पप्पा आणि मम्मीमुळे आहे. त्यांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवला. कधी हा विचार केला नाही की एक दिवस मी त्यांना सोडून जाणार आहे. उलट त्यांनी मुलीला शिक्षण देण्यात आयुष्य खर्च केले असेही या पोस्टमध्ये लिहीले आहे.