Viral Video : “गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

| Updated on: Jul 10, 2022 | 9:53 AM

अन भाऊजी… हात नका लाऊजी, पाहिल कुणीतरी… ही लावणी किंवा गाणे तुमच्यापैकी सगळ्यांनी ऐकले असेल. मात्र या गाण्याच्या चालीवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा ध्यास काही शिक्षक मंडळींनी घेतला आहे.

Viral Video : “गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
“गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – सोशल मीडियाचा (Social Media) लोक वापर करायला लागल्यापासून अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. तसेच रातोरात काही लोक सोशल मीडिया स्टार झाल्याचं आपणं पाहिलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर शिक्षकांचा (Teacher Group) एक व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंती पडला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. तर अनेकांनी तो व्हिडीओ आवडल्याचे सांगितले आहे. “छडी नका मारू – गुरुजी लागतंय हातावरी असं त्या गाण्याचं बोल आहे. एक शिक्षिका त्यांच्या सुंदर आवाजात ते गात आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले सगळे ते म्हणतं आहेत. नेमका हा व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे अद्याप माहिती पडलेलं नाही. परंतु व्हिडीओची चर्चा मात्र सगळीकडे आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अन भाऊजी… हात नका लाऊजी, पाहिल कुणीतरी… ही लावणी किंवा गाणे तुमच्यापैकी सगळ्यांनी ऐकले असेल. मात्र या गाण्याच्या चालीवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा ध्यास काही शिक्षक मंडळींनी घेतला आहे. “अहो गुरुजी… छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, असे म्हणत विद्यार्थ्यांमध्ये एका वेगळ्याच पध्दतीने प्रबोधन केले जाणार आहे. आणि त्याच्याच सरावाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे शिकवून त्यांचे प्रबोधन करत आहे

.एका शाळेच्या वर्गातील हा व्हिडीओ असल्याचं दिसतंय. जिथं लहान लहान मुलं नसून खुप सारे शिक्षक दिसत आहेत. आता हा व्हिडीओ चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इथं शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत आहे. या व्हिडीओत मात्र शिक्षिका बाकीच्या शिक्षकांना शिकवत आहे. खरं पाहिलं तर प्रत्येक शाळेची, शिक्षकांची शिकवण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही शिक्षक तर इतक्या वेगळ्या पद्धतीने शिकवतात ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. अशाच शिक्षकांपैकी हा एक शिक्षक मंडळींचा ग्रुप आहे, जो आपल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे शिकवून त्यांचे प्रबोधन करत आहे. यांच्याच शिकवण्याच्या हटके शैलीमुळे हा शिक्षक ग्रुप फेमस झाला आहे. आता त्यांनी या व्हिडीओत नेमकं काय सांगितले आहे, हे तुम्हीही बघा आणि आपल्या मुलांनाही दाखवा. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या.