नवी दिल्लीः भारतात अशी अनेक राज्यं आहेत, जिथं शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट आणि बिकट झाली आहे. शाळांमध्ये ना शिक्षक चांगले आहेत, ना शाळा व्यवस्थित आहेत. मात्र जे शिक्षक मुलांना नीट शिकवू पाहता, त्यांना मात्र त्यांच्या मनाप्रमाणे पगार मिळत आहे. ही गोष्टही अनेक शिक्षकांना खटकणारी आहे. शिक्षकांना चांगला पगार असेल तर त्या मुलांच्या शिकवण्यावर चांगलं लक्ष केंदित करता येईल.
संगीतमय पहाड़े.. ?
?
‘गणित’ और ‘संगीत’ का joint पीरियड ??
VC : SM pic.twitter.com/rL6he3MGko— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) November 8, 2022
तर आजच्या जगातही असे अनेक शिक्षक आहेत ज्यांचे संपूर्ण लक्ष हे मुलांना शिकवण्यात जाते. आणि काही शिक्षकांची शिकवण्याची पद्धत तर अतिशय अनोखी आणि विलोभनीय आहे.
त्यामुळे मुलांचे शिक्षण सोपे होत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यामध्ये एका शिक्षकाने मुलांना टेबल लक्षात ठेवण्याची पद्धत शिकवली आहै. ती पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, आमच्या काळात असे शिक्षक का बरे नव्हते.
सध्या सोशल मीडियावर त्या शिक्षकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मुले एका रांगेत बसली आहेत आणि एक वृद्ध शिक्षक टाळ वाजवत आहे.
आणि त्यांना टेबल शिकवत आहेत. आणि त्यांची आठवण करून देत आहेत. शाळेत शिक्षक मुलांना संगीतमय पद्धतीने गणिताचा टेबल विचार आहेत आणि मुलंही त्यांना त्याच पद्धतीने योग्य उत्तर देत आहेत. टेबल शिकवण्याचे हे अनोखे तंत्र अनेकांना आवडले आहे.
लहान मुलांना तक्ते लक्षात ठेवणे अवघड असते, मात्र या शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्यांना ते पटकन लक्षात राहणार आहेत.
त्यातून विद्यार्थ्यांना वाचनाचा आणि शिक्षणाचाही आनंद होणार आहे. आणि ते तक्ते सहज लक्षात ठेवता येणार आहेत. अशा पद्धतीने मुलांना शिकवताना तुम्ही क्वचितच कोणी शिक्षक पाहिला असणार आहात.
हा व्हिडिओ झारखंडचे उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.