नवी दिल्ली : नेहमीच इंग्रजीतील अप्रचलित शब्दांच्या माध्यमीतून सोशल मीडिया(Social Media)त वाद निर्माण करणारे काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा सोशल मीडियात वादाची ठिणगी पेटवली आहे. थरुर यांनी शुक्रवारी नवीन शब्द ट्विट केला आहे ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. थरुर यांनी ‘फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन’ (Folkinokinihilipilification) या शब्दाचा ट्विटमध्ये वापर केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामा राव यांच्याशी मैत्रीपूर्ण चर्चेदरम्यान लोकसभा सदस्य थरूर यांनी हा शब्द वापरला. (Tharoor’s new tweet; After the new tweet, there is a lot of discussion on social media, know what the tweet)
ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार या शब्दाचा अर्थ ‘अर्थहीन गोष्टींबद्दल विचार करण्याची सवय’ हा आहे. हा शब्द वापरल्यानंतर अनेक ट्विटर वापरकर्त्यांमध्ये या शब्दाचा उच्चारण आणि अर्थ काय आहे याबद्दल चर्चा सुरू झाली. काही वापरकर्त्यांनी फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन(Folkinokinihilipilification) या शब्दाची चर्चा फेसम गाणे कोलावेरी डी सह केली आहे. वापरकर्त्यांनी असे म्हटले आहे की कोलावेरी डी समजण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली होती. तसाच वेळ हा नवीन शब्द समजून घेण्यास आणि जाणून घेण्यास लागेल.
वास्तविक, केटी रामराव म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्या औषधांची नावे खूप अवघड आहेत, ज्यांचे उच्चार करणे सोपे नाही. याच्याच प्रत्युत्तरात थरूर ‘फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन’ म्हणाले. थरुरच्या ट्विटनंतर वापरकर्ते या शब्दाचा अर्थ शोधताना दिसले. या शब्दाच्या अर्थाबाबत ट्विटरवर जोरदार चर्चा, ट्रोल सुरु आहे. (Tharoor’s new tweet; After the new tweet, there is a lot of discussion on social media, know what the tweet)
VIDEO | अथांग समुद्रात उसळी घेणाऱ्या डॉल्फिनसोबत तरुणाचं स्विमिंग; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!https://t.co/iROaDlaZOq#ViralVideo |#socialmedia |#dolphin |#man |#swimming
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 21, 2021
इतर बातम्या
विधान परिषदेच्या 12 जागांबाबत निर्णय कधी? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यपालांच्या सचिवांना सवाल
शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अश्लील मेसेज, जीवे मारण्याचे धमकीचे फोन