आंध्रप्रदेश | 29 जुलै 2023 : आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलममध्ये अचानक समुद्राच्या किनाऱ्यावर प्रचंड मोठा ब्ल्यू व्हेल ( निळा देवमासा ) वाहत किनाऱ्यावर आल्याने त्याला पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर प्रचंड गर्दी झाली आहे. अनेकांना या ब्ल्यू व्हेलचे व्हिडीओ आणि फोटो काढत ते समाजमाध्यमावर व्हायरल केले आहे. आंध्रप्रदेशमध्ये यापूर्वी ब्ल्यू व्हेल आल्याचे फारसे ऐकीवात नसल्याने या माशाला पाहायला दूरवरुन लोक समुद्राच्या किनारी आले होते.
भारतात मान्सून जोरात सुरु असून दक्षिणेकडील राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना अचानक आंध्राच्या किनाऱ्यावर ब्ल्यू व्हेल मासा वाहत आल्याने स्थानिक मच्छीमारांना देखील ही अत्यंत दुर्लभ घटना असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानूसार श्रीकाकुलम सह आंध्रप्रदेशातील आठ स्थानांवर गेल्या 24 तासांत सात सेंटीमीटर पाऊस पडला आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओदिशा किनाऱ्यावर पश्चिम-मध्य आणि उत्तर पश्चिमी बंगालच्या किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
यामुळे तटीय आंध्रप्रदेश आणि रायसीमा क्षेत्रात अनेक स्थानकांवर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पश्चिम-मध्य आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी 65 प्रति किमी वेगाने तर काही ठिकाणी 45-55 प्रती किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
A juvenile Blue Whale washed up on Meghavaram sea shore in Srikakulam district of Andhra Pradesh. Blue whales are animal of deep sea and usually not found in Bay of Bengal. It is a matter of great curiosity not only for locals but for many on social media.pic.twitter.com/cfsuaJiXVp
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) July 28, 2023
ब्ल्यू व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा जलचर प्राणी असून त्याचे वजन 200 टन ( 33 हत्तीच्या वजना इतके ) असू शकते. त्याच्या हृदयाचा आकार एका volkswagen beetle कारच्या आकाराचे असते. त्यांच्या पोटोत एक टन क्रिल शेल फिश सामावू शकतात. त्यांना दिवसभरात चार टन क्रिल शेल फिशची गरज असते. अंटार्टिंका भवतालच्या समुद्रात मोठे देवमासे या क्रिल शेल फिशवरच गुजराण करतात.
ब्ल्यू व्हेलचा आवाजही सर्व प्राण्यात मोठा असतो. त्याचा आवाज जेट इंजिनपेक्षाही जास्त असतो. विश्व वन्यजीव महासंघाच्या माहीतीनूसार त्यांचा आवाज 188 डेसिबलपर्यंत पोहचू शकतो. एका जेटचा आवाज 140 डेसिबल इतका असतो. कमी आकाराच्या ब्ल्यू व्हेलचा आवाज शेकडो मैल पोहचू शकतो. ते अन्य ब्ल्यू व्हेलला हाक मारण्यासाठी या अशा प्रकारची शिट्टी मारतात.