पाच वर्षांनी झाली मायलेकांची भेट, थकलेली आई पाहून नाराज झाला, अखेर आजारी आईला खांद्यावर उचलून फिरवून आणले

| Updated on: May 28, 2023 | 3:26 PM

पाच वर्षांनी मुलगा घरी आला. आई अधिकच म्हातारी आणि कमजोर झाली होती. तिला उठताही येत नव्हते. तिने बाहेर फिरायला जाणे सोडून दिले होते. मग त्याने तिला तयार केले. तिला कारमध्ये उचलून बसविले तिच्या माहेरी नेले.

पाच वर्षांनी झाली मायलेकांची भेट, थकलेली आई पाहून नाराज झाला, अखेर आजारी आईला खांद्यावर उचलून फिरवून आणले
mother-son
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनामुळे परदेशात स्वित्झर्लंडमध्ये अडकलेला एक मुलगा त्याच्या आईला भारतातील केरळात पाच वर्षांनी भेटायला आला. आईला कमजोर आणि आणखी म्हातारी झाल्याचे पाहून तो नाराज झाला. मग त्याने म्हाताऱ्या आईला खांद्यावर घेऊन त्याने तिला फिरायला नेले. त्यामुळे म्हाताऱ्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मुलाच्या आणि आईच्या अनोख्या नात्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे.

रोजन यांना कोरोनामुळे पाच वर्षे भारतात येता आले नाही. त्यांनी पाच वर्षांनी केरळला भेट दिली तेव्हा त्यांच्या आईला पाहून त्यांना वाईट वाटले. आई अधिकच म्हातारी आणि कमजोर झाली होती. तिला उठता येत नव्हते. तिने बाहेर फिरायला जाणे सोडून दिले होते. मग त्याने तिला तयार केले. तिला कारमध्ये उचलून बसविले तिच्या माहेरी नेले. त्याने यापूर्वी आईला तो नोकरी करीत असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये फिरायला नेले होते. त्या आठवणी पुन्हा जाग्या करायच्या होत्या. त्याची आई अनेक घटना विसरली होती. आई जास्त वय झाल्याने जवळच्या ठिकाणीच जाऊ शकत होती, त्यामुळे रोजन यांनी नजिकच्या ठीकाणी तिला फिरवून आणले.

हा पाहा व्हिडीओ…

रोजन यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी अमाचीला आम्ही स्वित्झर्लंड दाखवून आणले होते. कोविडमुळे मी पाच वर्षांनी भारतात आलो. आता अमाची अधिकच म्हातारी झाली होती. तिचे केस खुपच पांढरे दिसत होते. ती कमजोरीमुळे उभीही राहू शकत नाही. तर चालणे खूपच दूरची गोष्ट आहे. अनेक वर्षे ती चर्चलाही गेली नाही. मग तिला घेऊन बाहेर फिरवून आणण्याचा निर्णय घेतला.

रोजन वृद्धाश्रमात काम करतात

मी स्वित्झर्लंडमध्ये एका वृद्धाश्रमात काम करतो. म्हणून मला अनुभव आहे. मी तिला अंघोळ घातली, बहीणीने तिला कपडे घातले. आणि तिला कारमधून फिरवून आणायचा निर्णय घेतला. काही जण म्हणाले की तिला या अवस्थेत नेऊ नका, पण मी तिला खांद्यावर उचलून कारमध्ये ठेवले. 20 किमीवरील अथिरुंपुझा येथील आमच्या गावी नेले. मी जगात विविध ठिकाणी राहणाऱ्या आमच्या भावंडांना तिचे व्हिडीओ पाठवले. सर्वजण अमाचीला पाहून चिंतेत पडले. पण आनंदीही झाले. मी तिला नीलकुरिंजीला नेले. ती ट्रीपमुळे थकली होती, थोडी आजारीही पडली. पण आनंदी झाली. कारण तिला तिथे जायचं होतं. इंटरनेटवर रोजन आणि अमाची यांच्या आई-पुत्राच्या प्रेमाला पाहून युजर भावूक होत आहेत. आणि रोजनला आधुनिक श्रावणबाळही म्हणत आहेत.