मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुण मेट्रोमधून (Metro)प्रवास करीत आहे. त्याला अचानक झोप आल्यानंतर तो बसल्या जागीच डुलकी घेत आहे. जेव्हा तरुण खाली पडणार असतो, त्यावेळी तरुणीने केलेली कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मेट्रोमधील अनेक व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काहीजण खास मेट्रोमध्ये रिल्स बनवताना दिसतात. रिल्स तयार करणाऱ्यांचे सुद्धा अधिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मागच्या आठवडाभरात एकजण मेट्रोच्या सीटवर चक्क झोपून प्रवास करीत असल्याचे पाहायला मिळाले होते.
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण निळा टी-शर्ट घालून बसला आहे. त्याला झोप लागल्यानंतर सगळे त्याच्याकडे पाहत आहेत. शेजारी बसलेली तरुणी त्याच्याकडे पाहत होती. तो झोपेत खाली घसरु लागला, त्याचवेळी त्या तरुणीने खाली पडण्याच्या आगोदर एका हाताने टी-शर्ट पकडला त्यामुळे तो खाली पडला नाही.
Md Moeen Shaikh या इन्स्टाग्राम वापरकर्त्याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. त्यावर असंख्य कमेंट सुद्धा आल्या आहेत. काही जणांसाठी तो व्हिडीओ म्हणजे एक गंमत आहे.